sachin-waze 2.jpg
sachin-waze 2.jpg 
मुंबई

मनसुखचा मृतदेह सापडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सचिन वाझेनं काय केलं?

दीनानाथ परब

दोन पोलीस निरीक्षक आणि मुंबई पोलीस दलातील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात येत्या एक ते दोन दिवसात त्यांना NIA कडून चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझेने चौकशीमध्ये NIA ला सांगितले की, ६ मार्चला मनसुखचा मृतदेह मिळाल्यानंतर दुसऱ्याचदिवशी आपण पाच मोबाइल फोन नष्ट केले. यामध्ये वाझेचा स्वत:चा मोबाइल सुद्धा होता. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.  

वाझेच्या अधिकृत मोबाइल फोनमधील डाटा मिळवण्यासाठी एनआयएचे अधिकारी तज्ज्ञांची मदत घेत आहेत, कारण तो हिरेन हत्या प्रकरणात भक्कम डिजिटल पुरावा ठरेल. वाझे १३ मोबाइल फोन वापरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्कॉर्पियो कारमध्ये सापडलेली स्फोटके आणि ती कार वापरत असलेल्या मनसुख हिरेनच्या हत्या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये वाझेचा प्रमुख सहभाग आहे. मनसुखचा मृतदेह पाच मार्चला मुंब्र्यातील खाडीत सापडला होता. 
 

डायटॉम टेस्टवरुन भाजपाचा जे.जे. रुग्णालयावर गंभीर आरोप 
 मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीत सापडला होता. मनसुख हिरेन यांनी पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली आहे का? हे तपासण्यासाठी मृतदेहाची डायटॉम टेस्ट करण्यात आली. डायटॉम टेस्टमधुन मृत व्यक्तीच्या  फुफ्फुसांमध्ये पाणी होतं का? हे तपासलं जातं. मान्यताप्राप्त प्रयोगशाळाच ही टेस्ट करु शकते. मनसुख यांच्या अवयवांचे नमुने कलिना फॉरेन्सिक लॅबला पाठवल्यानंतर त्यांनी आम्ही ही चाचणी करु शकत नाही, हे स्पष्टपणे सांगितलं. 

जे.जे. हॉस्पिटलमध्ये डायटॉम टेस्ट होऊ शकत नाही, मग तरीही तिथे ही चाचणी का केली? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांना ही टेस्ट आपल्या इथे होऊ शकत नाही, हे माहित असतानाही त्यांनी ही टेस्ट का केली? टेस्ट केल्यानंतर ही स्क्रिनिंग टेस्ट होती, असे सांगितले. या टेस्टच्या माध्यमातून अवयवांच्या पुराव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आशिष शेलार यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

Mumbai Lok Sabha: मुंबईत मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने? ठाकरेंना होणार फायदा?

Rohit Sharma Hardik Pandya : पुढच्या हंगामात रोहित अन् हार्दिक दोघांना मिळणार नारळ? भारताच्या दिग्गजाला म्हणायचं तरी काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

SCROLL FOR NEXT