Sacrifice of INS Khukri in 1971 Indo Pak War Tribute by Navy to warship by going bottom of sea 
मुंबई

1971 Indo-Pak War : 1971 च्या भारत पाक युद्धात आयएनएस खुकरीचे बलिदान

युद्धनौकेला समुद्राच्या तळाशी जाऊन नौदलातर्फे श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय नौदलाने रविवारी समुद्राच्या तळाशी जाऊन पुष्पहार अर्पण करून आयएनएस खुकरी आणि त्यातील जवानांच्या बलिदानाला अनोखी श्रद्धांजली वाहिली . 1971 च्या भारत पाक युद्धात आयएनएस खुकरीने शत्रूशी लढता लढता बलिदान दिले . या युद्धात भारतीय नौदलाचे आयएनएस खुकरी 18 अधिकाऱ्यांसह 176 खलाशी वीरगतीस प्राप्त झाले. त्याचीच आठवण ठेवत नौदलाने अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.

3 डिसेंबर 1971 च्या रात्री भारतीय नौदलाचे जहाज मुंबईहून निघाले होते . आपल्या मोहिमेदरम्यान आयएनएस खुकरीची पाकिस्तानी नौदलाची पाणबुडी पीएनएस हँगोरशी सामना झाला. पाकिस्तानी पाणबुडी समुद्रात हल्ला करण्याच्या दृष्टीने गस्त घालत होती . दरम्यान, आयएनएस खुकरीच्या एअर कंडिशनिंगमध्ये काही समस्या आल्याने त्याना मोहिमेत अडथळे येत होते.

या दरम्यान आयएनएस खूकरी आणि पाकिस्तानी पाणबुडीमध्ये सामना झाला. मात्र, या युद्धादरम्यान भारतीय नौदलाची आयएनएस खुकरी पाण्यात बुडाली. या युद्धात भारतीय नौदलाचे आयएनएस खुकरी 18 अधिकाऱ्यांसह 176 खलाशाना वीरगतीस प्राप्त झाले . यात कमांडिंग ऑफिसर कॅप्टन महेंद्र नाथ यांचाही सहभाग होता.

1971 च्या युद्धात भारतीय नौदलाच्या जहाजांनी शत्रूची अवस्था बिकट केली होती. 1971 च्या युद्धात भारतीय सैन्याने देशाच्या रक्षणासाठी सर्वस्व पणाला लावले होते. देशाच्या रक्षणासाठी असंख्य जवानांनी बलिदान दिले होते. या युद्धात भारतीय नौदलाने अतुलनीय शौर्य आणि शौर्य दाखवले. आयएनएस खुकरी आणि क्रू यांच्या बलिदानाला नौदलाकडून अनोखी श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ; 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतील इतके पैसे

पोस्टाची ५० वर्षे जुनी सेवा बंद, रजिस्टर्ड पोस्ट ऐवजी आता स्पीड पोस्ट; खर्च वाढणार

'दादा, यावेळी मी तुला राखी बांधू शकणार नाही'; २४ वर्षीय नवविवाहित प्राध्यापिकेनं चिठ्ठी लिहून संपवलं जीवन, पती-सासरकडून होत होता छळ

Latest Maharashtra News Updates Live : नांदणी मठानं याचिका दाखल करावी- मुख्यमंत्री फडणवीस

लग्न न करताच बाबा होणार 'सैराट' फेम अभिनेता? गर्लफ्रेंडने शेअर केले बेबी शॉवरचे फोटो, आईचा विरोध होता म्हणून...

SCROLL FOR NEXT