sadavarte couple again cheats with ST employees congress shrirang barge criticism Sakal
मुंबई

Mumbai : सदावर्ते दांपत्याकडून एसटी कर्मचाऱ्यांसोबत पुन्हा लबाडी; काँग्रेसचे श्रीरंग बरगे यांची टीका

ऐन दिवाळीच्या तोंडावर कामबंद आंदोलनाची दिली नोटीस

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : साडे पाच महिन्यांच्या प्रदीर्घ संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लिखित स्वरूपात लागू झाला म्हणून आझाद मैदानात गुलाल उधळत जल्लोष केला. आता मात्र, पुन्हा सातवा वेतन आयोगाच्या मागणीसाठी काम बंद आंदोलनाची नोटीस देणे ही एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल नाही का ?

असा सवाल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे श्रीरंग बरगे यांनी उपस्थित केला आहे. सदावर्ते वकील दाम्पत्याकडून एसटी कर्मचाऱ्यांसोबत पुन्हा लबाडी केली जात आहे. अशी टीका बरगे यांनी केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला. संपात सहभागी कर्मचाऱ्यांना सेवा सलगता मिळाली असे जाहीर करून आझाद मैदानावर गुलाल उधळण्यात आला. मग आता पुन्हा सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करणे ही दिशाभूल असून या मध्ये स्पष्ट लबाडी दिसत आहे.

पूर्वीच्या सरकारने गठित केलेल्या समितीचे निर्णय मान्य नव्हते तर त्याला त्या वेळी न्यायालयात आव्हान का देण्यात आले नाही ? या शिवाय आठ टक्के महागाई भत्ता हल्लीच राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्याचा फरक त्यांनीच द्यायला हवा होता मात्र, तो दिलेला नाही. त्या बद्दल सरकारला जाब का विचारला जात नाही ?

आज प्रसार माध्यमांसमोर बोलताना वकील महाशयांनी जुन्या गाड्यांच्या कामा संदर्भातील लॉगसीटवरील शेऱ्यांचा उल्लेख केला आहे. व तशी ध्वनीफित सुद्धा व्हायरल झाली आहे. पण नवीन गाड्या उशिरा येण्यास विद्यमान सरकार जबाबदार असून २२०० नव्या गाड्या घेण्याची फाईल गेले अनेक दिवस सरकारकडे धूळखात पडून आहे.

त्यासाठी ९०० कोटी रुपयांच्या निधीची बजेट मध्ये तरतूद करण्यात आली आहे. मग ती फाईल प्रलंबित ठेवण्यामागील हेतू काय? या बाबतीत सरकारला जाब विचारण्याची गरज असताना ते का केले जात नाही? असा प्रश्नही बरगे यांनी उपस्थित केला आहे. एसटी कर्मचाऱ्याना संप काळात दिलेली वेतन वाढ ही चुकीची असून त्यात दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

या शिवाय गेली अनेक वर्षे महागाई भत्त्याचा फरक मिळालेला नाही. तो दिला पाहिजे. हे सरकारचे काम असून त्यांना जाब विचारण्याऐवजी प्रशासनाला नोटीस देऊन कर्मचाऱ्यांनी दिशाभूल केली जात असल्याचा सदावर्ते दांपत्यावर बरगे यांनी आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT