Kishori Pednekar टिम ई सकाळ
मुंबई

मुंबईवर भगवा फडकेल अन् महापौर शिवसेनेचाच होईल - पेडणेकर

आज मुंबई महापालिकेची मुदत संपत आहे. निवडणूक न झाल्यानं पालिकेवर प्रशासक नेमावा लागणार आहे. त्यामुळं महापौर म्हणून किशोरी पेडणेकर यांचा आजचा शेवटचा दिवस आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई महापालिकेची आज मुदत संपत आहे, त्यामुळं किशोरी पेडणेकर यांचा महापौरपदाचा आजचा शेवटचा दिवस आहे. पण निवडणूक न झाल्यानं पालिकेवर प्रशासक नेमावा लागणार आहे. यापार्श्वभूमीवर पेडणेकरांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल आणि महापौर देखील शिवसेनेचाच होईल, असा विश्वास व्यक्त केला. (saffron will waving on BMC and mayor will be also Shiv Sainik says Kishori Pednekar)

पेडणेकर म्हणाल्या, "मुंबईकर निश्चितच शिवसेनेसोबत आहेत. उद्धाव ठाकरे यांनी जे काम केलंय तसंच आता आदित्य ठाकरेही ज्या प्रकारे मुंबईसाठी काम करत आहेत त्यावरुन मुंबईत शिवसेनेचा भगवा राहणारच. लोकांच्या आशीर्वादानं हा भगवा फडकत राहिलं आणि महापौरही शिवसेनेचाच असेल"

"माझ्यासाठी उद्यापासून नवी इनिंग सुरु होईल. आत्ता जसं काम करत आहोत तसंचं पुढेही काम करत राहू. माझी टर्म जरी संपत असली तरी पत संपलेली नाही. जोपर्यंत पुढचा महापौर खुर्चीवर बसत नाही तपोर्यंत मी खुर्चीवर न बसता मुंबईकरांसाठी काम करत राहिन," असं भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

दरम्यान, संपूर्ण देशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगल्या कारभारासाठी तीन वेळा अव्वल आलेत. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमत्री आणि आघाडी सरकारमधील सदस्य म्हणून योग्य प्रकारे निर्णय घेऊन उद्धव ठाकरे पुढे चाललेले आहेत. त्यामुळं आमच्या समोर जे येईल त्या प्रत्येक संधीचं आम्ही सोनं करु, असा मानसही यावेळी महापौर पेडणकर यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT