साग तस्करांसोबत वन अधिकारी.
साग तस्करांसोबत वन अधिकारी. 
मुंबई

शहापुरात साग तस्करीचा डाव फसला

सकाळ वृत्तसेवा

शहापूर : शहापुरातील दहागाव हद्दीतील बरफपाडा येथे सागाच्या झाडांची बेकायदा तोड करून वाहतूक करणाऱ्या दोन वन तस्करांना वन अधिकाऱ्यांनी अटक केली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत इतर पाच जण फरारी झाले आहेत. या कारवाईत सुमारे दीड लाख किमतीच्या सागाच्या 40 नगांसह वाहतूक करणारा टेम्पो व दुचाकी असा एकूण सात लाख किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. 

शहापूर तालुक्‍यातील दहागाव-पिवळी परिसरात बेकायदा तोड केलेल्या सागाच्या झाडांची वाहतूक होणार असल्याची माहिती शहापूर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मंगळवारी (ता. 20) रात्री पिवळी परिसरातील जंगलात पाळत ठेवली होती. त्यांनी एक पिकअप टेम्पो अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे दीड लाख किमतीचे सागाचे 40 नग आढळून आले. या कारवाईत संतोष पादीर व रवींद्र वाघे या दोघांच्या मुसक्‍या आवळल्या असून पाच वनतस्कर अंधाराचा फायदा घेऊन फरारी झाले. दोघांना 23 ऑगस्टपर्यंत वन कस्टडी सुनावण्यात आली आहे. 

दहागाव वनव्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी, प्रशांत देशमुख, संजय चन्ने, तसेच वनपाल के. सी. मोहरघे, डी. व्ही. शेलार, सुनील भोंडीवले, वनरक्षक एस. एच. निकम, सचिन तळपाडे, आर. व्ही. झोले, व्ही. डी. फळे, आर. बी. वाघमारे, प्रवीण विशे, नामदेव बांगर, आर. व्ही. चौधरी, जे. एन. गावंडे, जे. पी. अहिरे आदी या पथकात सहभागी झाले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT