मुंबई

सकाळ सन्मान सोहळा: कोरोनायोद्ध्यांच्या पाठीवर मुख्यमंत्र्यांची थाप, सामाजिक जाणीवेने मोलाची कामगिरी

कृष्ण जोशी

मुंबई: कोरोनाच्या कठीण काळात अनुभवसिद्ध डॉक्टर, आरोग्य कर्मचारी डगमगले नाहीत, प्रशासनाने चांगली साथ दिली, हीच महाराष्ट्राची ताकद आहे. मी फक्त प्रत्येकाच्या जिद्दीवर, आत्मविश्वासावर फक्त फुंकर घालून तो जागवण्याचा प्रयत्न केला. त्याचमुळे औषध नसतानाही आपण कोरोना नियंत्रणात आणला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळ सन्मान सोहळ्यात कोरोना योद्ध्यांचे कौतुक केले.

कोरोनावर मात करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांना गौरविणारा सकाळ सन्मान 2021 हा कार्यक्रम आज प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरात झाला. कोरोनाला पराभूत करण्यात वाटा उचलणारे शवागृहातील कर्मचारी कमलेश सोळंकीपासून महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे अशा लहानथोर कोरोनायोद्ध्यांचा सत्कार झाल्याने सर्वचजण भारावून गेले. विशेषतः सकाळने सामाजिक बांधीलकीचा जाण ठेऊन हा कौतुकसोहळा आयोजित केल्याने सर्वच पुरस्कार विजेते हरखून गेले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नाट्य, अभिनय, समाजसेवा क्षेत्रातील मान्यवर आदींच्या उपस्थितीने हा सोहळा अत्यंत रंगतदार झाला.

वर्तमानपत्र वाचकांसाठीच

सकाळचे संस्थापक ना. भि. परुळेकर यांचा या सोहळ्यात ठाकरे यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. पहिल्या पानावर लहान मथळ्यात जास्तीत जास्त बातम्या सकाळका देतो, याचे कारण सांगताना वर्तमानपत्रांतील सर्व जागेवर वाचकांचा हक्क असतो, असे उत्तर परुळेकर यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दिल्याची आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली. असे व्रत घेतलेल्या महर्षीचा वारसा सकाळ आजही पुढे नेत आहे. बातम्या, लेख देताना त्याबरोबरच सामाजिक परिस्थितीचे भान ठेवणे महत्वाचे असते, ते जपण्याची बांधिलकी सकाळ ने या कार्यक्रमातही दाखवली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सकाळ चे कौतुक केले.

औषध नसतानाही आपण कोरोनावर मात केली ही मोठी कामगिरी आहे. कोरोनावर मात करणाऱ्या कोविड योद्ध्यांबद्दलचे ऋण व्यक्त करण्यासाठी मी येथे आलो आहे. कोरोनाच्या कठीण काळात तोलामोलाची माणसं भेटली, अनुभवसिद्ध डॉक्टर आजारी पडूनही घाबरले नाहीत. ही महाराष्ट्राची ताकद, लोकांची जिद्द यावर फक्त फुंकर घालून त्यांचा आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न मी केला. ते दिवस आठवून खरेतर अंगावर काटा येतो. दिवसरात्र मेहनत घेऊनही आपण पुरे पडू का ते कळत नव्हतं. सरकार कमी पडतंय हे सांगणे ठीक होते, मात्र तेव्हाच्या आमच्या अडचणी सांगितल्या असत्या तर सर्वजण घाबरले असते. तेव्हा सकाळसह सर्वच प्रसारमाध्यमांनी आणि सर्वांनीच सामाजिक जाणीव ठेऊन मोलाची कामगिरी केली, आता संकट टळले असले तरी अजूनही इंग्लंडमधील विषाणूचा मानवजातीला मोठा धोका आहेच. त्यामुळे असे दिवस पुन्हा येऊ नयेत यासाठी लस घेतल्यानंतरही कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन होईपर्यंत जास्तीत जास्त काळजी घ्यावी, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

अडकवले की लटकवले
 
आपल्याला कोणताही अनुभव नसताना मुख्यमंत्रीपद देऊन शरद पवार यांनी आपल्याला अडकवले की लटकवले हे कळत नाही. हे म्हणजे शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्याला एकदम मुख्याध्यापक केल्यासारखाच प्रकार आहे, असे ठाकरे यांनी सांगताच सभागृहात एकच हास्यस्फोट झाला.

Sakal honors ceremony Cm uddhav thackeray Corona warriors

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT