मुंबई

सकाळ Impact: अखेर शिक्षकांना मिळाली लोकल प्रवासाची मुभा

संजीव भागवत

  • राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल दिले होते आश्वासन

  • दहावीच्या निकालाचे कामकाज होणार सुरळीत

मुंबई: शहर आणि परिसरात राहणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर (Teachers) यांना लोकल प्रवासाची मुभा (Permission to Travel in Local Trains) देण्याचा महत्त्वाचा निर्णय आज सरकारने (Thackeray Govt) घेतला आहे. या निर्णयामुळे मागील सात दिवसांपासून दहावीच्या मूल्यांकन (SSC Results) प्रक्रियेचे रखडलेले काम आता सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला. मागील सात दिवसांपासून 'सकाळ'ने (Sakal Impact) याविषयी शिक्षकांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे वास्तव वेळोवेळी मांडले होते. लोकल प्रवासाची मुभा न मिळाल्याने मूल्यांकनाचे कामकाज रखडल्याचे वृत्तही प्रसिद्ध केले होते. त्या पार्श्वभूमीवर आज सरकारने शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. (Sakal Impact as Finally Teachers get permission to travel by Local Trains for SSC Results)

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी याविषयी कालच आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून दोन दिवसात निर्णय होईल, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे सरकारने हा निर्णय आज घेतल्याने या निर्णयाचे शिक्षण क्रांती संघटना, शिक्षक परिषद, लोक भारती, शिक्षक सेना, भाजप शिक्षक सेल आदी शिक्षक संघटनांनी जोरदार स्वागत केले आहे. मुंबई आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू असल्याने सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून यासाठी मागील सात दिवसांपासून परवानगी देण्यासंदर्भात निर्णय प्रक्रिया रखडली होती. मात्र दहावीच्या परीक्षा आणि त्यांच्या मूल्यांकन कार्यपद्धतीचा विषय अत्यंत निकडीचा असल्याने त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय आज जाहीर केला आहे.

लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी शिक्षकांना लेवल-2 किंवा त्यापेक्षा खालील पास देण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयातून दहावीचे कामकाज पाहणाऱ्या शिक्षकांची नोंद करून त्यांना ऑनलाईन पद्धतीने हे पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यासाठी त्यांना नोंदणी नंतर एसएमएस द्वारे ही माहिती दिली जाणार आहे. यासाठी शिक्षकांनी आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे.

मुंबई, ठाणे परिसरात असलेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये असलेले शिक्षक हे मुंबई बाहेर कल्याण, कर्जत, कसारा, टिटवाळा, शहाड, बदलापूर, अंबरनाथ आदी ठिकाणी राहतात, या शिक्षकांना आता आपल्या शाळेत पोचण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

दहावीच्या मूल्यांकन आणि त्याच्या कार्यपद्धतीसाठी शिक्षकांना आपल्या शाळेत पोचावे लागेल, यासाठी लोकल प्रवासाची त्यांना तातडीने मुभा द्यावी अशी मागणी आम्ही 9 जून रोजी केली होती, मात्र त्यावर निर्णय घेण्यास शिक्षण विभाकडून सुरुवातीला दिरंगाई झाली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आमच्या भावना समजून घेतल्या त्यामुळे आज निर्णय झाला, त्याचे आम्ही स्वागत करतो.

-सुधीर घागस, अध्यक्ष शिक्षण क्रांती संघटना

शिक्षकांना लोकांनी प्रवास मिळावा म्हणून आम्हाला शेवटी प्रत्येक रेल्वेस्थानकांवर आंदोलन करावे लागले. असंख्य शिक्षकाने रेल्वेस्थानकावर सेल्फी काढून यासाठीचा संताप व्यक्त केला मात्र त्यावर योग्य वेळेत निर्णय घेण्यासाठी कार्यवाही शिक्षण विभागाने केली नाही म्हणून यासाठी दिरंगाई झाली. मात्र काल आम्हाला शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आश्वासन दिले होते आणि आज त्याप्रमाणे सरकारने निर्णय घेतला असून त्याचे आम्ही स्वागत करतो.

- शिवनाथ दराडे, कार्यवाह, शिक्षक परिषद

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT