MNS Workers Sena esakal
मुंबई

MNS Workers Sena : मनसे कामगार सेनेने ठिय्या करताच उल्हासनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार ट्रान्सफर

शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असल्याने पगार लांबणीवर पडणार

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : महिन्याची 7 तारीख उजाडली तरी पगार होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने लेखा विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करताच,उल्हासनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार ट्रान्सफर करण्यात आला आहे.

जून महिन्याची 7 तारीख उजाडली.शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असल्याने पगार लांबणीवर पडणार.यामुळे आक्रमक पवित्रा हाती घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे महानगरपालिका युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांनी त्यांच्या टीमसोबत लेखा विभागाचे कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन सुरू केले.मुख्यलेखा अधिकारी किरण भिलारे यांच्या दालनात कामगारांचा पगार,सेवा निर्वूत कामगारांची पेन्शन,आणि कामगारांना मिळणारा वार्षिक प्रवास भत्ता त्वरित देण्या संदर्भात चर्चा झाली असता,किरण भिलारे यांनी युनियन संघटनाच्या मागण्या मंजूर करून आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार त्वरित कामगारांचा पगार व पेन्शन कामगारांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्याच्या सूचना संबंधित स्टाफला दिल्या.

पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर झाल्याची माहिती युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांनी दिली असून त्यांनी आयुक्त अजीज शेख,मुख्यलेखाअधिकारी किरण भिलारे यांचे आभार मानले आहेत.यावेळी कामगार सेनेचे पदाधिकारी हरी आल्हाट,शालिग्राम सोनवणे,ज्योती पवार,कार्यकर्ते चौधरी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT