Sameer Wankhede and Ananya Pandey 
मुंबई

"हे तुझं प्रॉडक्शन हाऊस नाही"; अनन्याला समीर वानखेडेंनी फटकारलं

चौकशीला उशिरा पोहोचलेल्या अनन्यावर समीर वानखेडे भडकले.

स्वाती वेमूल

क्रुझ रेव्ह पार्टी प्रकरणात केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने NCB शुक्रवारी अभिनेत्री अनन्या पांडेची Ananya Pandey सलग दुसऱ्या दिवशी चार तास चौकशी केली. मात्र चौकशीला उशिरा पोहोचलेल्या अनन्याला एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे Sameer Wankhede यांनी फटकारलं. चौकशीसाठी ११ वाजता बोलावलं असताना अनन्या दुपारी दोन वाजता एनसीबी कार्यालयात पोहोचली होती. 'इथे अधिकारी तुझी वाट पाहत बसलेले नाहीत. हे तुमचं प्रॉडक्शन हाऊस नाही, केंद्रीय तपास यंत्रणेचं कार्यालय आहे. तुम्हाला ज्या वेळी इथे बोलावलं आहे, त्यावेळी पोहोचायला हवं', अशा शब्दांत वानखेडेंनी अनन्याला सुनावलं.

शुक्रवारी अनन्या तिचे वडील चंकी पांडेंसह एनसीबी कार्यालयात पोहोचली होती. सलग चार तास तिची चौकशी करण्यात आली. तिच्या चौकशीतून अद्याप ठोस पुरावा मिळाला नसल्याचं सूत्रांचं म्हणणं असून अनन्याला सोमवारीदेखील चौकशीसाठी एनसीबीनं बोलावलं आहे. शुक्रवारी अभिनेता शाहरूख खान याचा बॉडीगार्डदेखील एनसीबी कार्यालयात दाखल झाला होता. त्याने एक बंद लिफाफा एनसीबीकडे दिल्याचं सांगण्यात आलं.

आर्यन खानबरोबर अनन्याचे ड्रग्जसंबंधी मोबाईलवरील व्हॉट्स अ‍ॅपवर चॅटचे पुरावे एनसीबीकडे आहेत. यातूनच अनन्याची चौकशी एनसीबी करीत आहे. गुरुवारी एनसीबीने अनन्याच्या वांद्रे इथल्या घरावर छापेमारी करीत तिचा मोबाईल व लॅपटॉप जप्त केला होता. त्यानंतर तिची मुंबई एनसीबी ऑफिसमध्ये चौकशी करण्यात आली होती. क्रुझ रेव्ह पार्टी प्रकरणात आर्यन खान सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. अनन्या आणि आर्यन हे लहानपणापासून मित्र आहेत. आर्यन, अनन्या आणि आर्यनची बहीण सुहाना हे नेहमी एकत्र वेळ घालवताना दिसायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT