congress sachin sawant attack on kirit somaiya criticize bjp leader kirit somaiya injury  Sakal
मुंबई

जखम की टोमॅटो सॉस? किरीट सोमय्यांनी दिलं उत्तर; म्हणाले...

शिवसैनिकांच्या हल्ल्यात सोमय्या यांना झालेल्या जखमेचा वैद्यकीय अहवाल आला आहे. संजय राऊतांनी ही जखम नसून टोमॅटो सॉस असल्याचा दावा केला होता.

सकाळ डिजिटल टीम

राणा दाम्पत्याला पोलीस स्टेशनमध्ये भेटायला गेलेल्या किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांच्या गाडीची तोडफोड झाली, तसंच त्यांच्या चेहऱ्यावर बारीक जखमही झाली. पण ही जखम नसून टोमॅटो सॉस आहे, अशी टीका संजय राऊतांसह शिवसेनेचे नेते करत होते. आता या जखमेचा अहवाल समोर आला असून बारीक जखम झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी राऊतांवर टीका केली आहे.

संजय पांडे यांनी बोगस एफआयआर दाखल केला असा आरोप करत किरीट सोमय्या यांनी काही प्रमुख भाजपा नेत्यांसह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले,"देवकृपेने, कमांडोमुळे मी वाचलो. उद्धव ठाकरेंची इच्छा पूर्ण झाली नाही, म्हणून उद्धव ठाकरेंची माफिया सेना प्रश्न करत आहे. उद्धव ठाकरे साहेब, दगड आला ते तुमच्या पोलिसांनी एफआयआरमध्ये लिहिलंय. दगडफेक होत होती, ही प्रत्येक चॅनेलवर लाईव्ह दाखवत होते. काच तुटली, बारिकशी जखम झाली आहे. हे मी तेव्हाही सांगितलं होतं आणि एफआयआरमध्येही तेच लिहिलेलं आहे. पण ठाकरेंचा प्रश्न आहे की इथे(हनुवटीला) काच का लागली? इथे(डोळ्याला) लागायला हवी होती. डोळा जायला हवा होता. आंधळा व्हायला हवा होता".

सोमय्या पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की दगड किरीट सोमय्याच्या डोक्याला लागायला हवा होता. म्हणून माफियासेना प्रश्न विचारतात की बारीक जखम झाली..हो बारीकच जखम झालीये...मी तेच म्हटलं होतं. केचअप हा शब्द संजय राऊतांनी वापरला होता, त्यामुळे त्यांना विचारायला हवं की केचअप जखमेत रुपांतरीत कसं झालं? माफियासेनेकडून मला दुसरी अपेक्षा नाही. पण आय़ुक्तांनी बोगस एफआयआर दाखल केली, त्यांच्यावर कारवाई होणार होणार होणार..."

किरीट सोमय्या यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर भाभा हॉस्पिटलने मुंबई पोलिसांना अहवाल सादर केला आहे. या अहवालात समोर आलेल्या माहितीनुसार, सोमय्या यांना केवळ ०.१ सेमीची छोटीशी जखम आहे. जखमेच्या आसपास कोणतीही सूज नाही, रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात नाही, तसंच कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 World Cup : हस्तांदोलन नाहीच! भारतीय संघाच्या अंतिम ११ मध्ये दोन बदल; पाकिस्तानला टॉसच्या वेळीच दिला दम

Pune Bharat Taxi: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांसाठी भारत टॅक्सी सेवा सुरू; दर किती आणि कसे आकारणार?

IND vs PAK : जय शाह यांचा 'Dhurandhar' प्लान! पाकड्यांना त्यांची जागा दाखवण्याची सोडणार नाही संधी, सामन्यापूर्वीच होणार 'गेम'

नवरा असावा तर असा ! बायकोसाठी हार्दिकने पाहिलंय 'हे' स्वप्न; "तिने राणीसारखं मोठ्या गाडीत बसावं आणि मी.."

Latest Marathi News Live Update : बदलापूरमध्ये चोरटयांनी एकाच रात्रीत सात दुकानं फोडली

SCROLL FOR NEXT