Sanjay-Raut 
मुंबई

म्हणून महाराष्ट्राचं जगात कौतुक होतंय; संजय राऊतांकडून पाठराखण

विराज भागवत

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आणि संपूर्ण लॉकडाउनचा इशारा दिला. 'हे बंद करा, ते बंद करा ही आपली भूमिका नाही. पण येणाऱ्या बिकट परिस्थितीवर वेळीच मात करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे आता जिंदगी, जान, उसके बाद काम या पद्धतीने जावे लागेल', असे ते म्हणाले. विरोधक मात्र लॉकडाउन विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांची कानउघाडणी केली तर ठाकरे सरकारची पाठराखण केली.

"महाराष्ट्रात ५० हजार आणि मुंबईत १० हजारांच्या आसपास रुग्ण दररोज सापडत आहेत. पण याचं प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रात कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. इतर राज्यात मात्र कोरोना चाचण्या इतक्या मोठ्या प्रमाणावर केल्या जात नाहीयेत. इतर राज्यात कशामुळे मृत्यू झाले याची नोंदच नाहीये. महाराष्ट्राने काहीही लपवलेलं नाहीये आणि म्हणून महाराष्ट्राचं सध्या जगात कौतुक होतंय", अशा शब्दात राऊत यांनी ठाकरे सरकारची पाठराखण केली.

"महाराष्ट्र आत्मनिर्भर आहे. म्हणूनच महाराष्ट्राने एवढ्या वर्ष देशाच्या तिजोरीमध्ये मोलाचे योगदान देत भर टाकली आहे. जर महाराष्ट्र कोलमडला तर संपूर्ण देश कोलमडेल हे साऱ्यांचा माहिती आहे. विरोधक लॉकडाउनची नको अशी मागणी करत आहेत. मी विचारू इच्छितो की महाराष्ट्राची अवस्था वाईट झाली तर त्याचा परिणाम देशावर होईल हे फडणवीसांना माहित नाहीये का? केवळ महाराष्ट्रात तुमची सत्ता नाही म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीत कोट्या करत बसणार आहात का? असं करत असाल तर ही बाब योग्य नाही", असं संजय राऊत म्हणाले.

"लॉकडाउनच्या दृष्टीने आर्थिक पॅकेज देण्याचा मुद्दा बरोबर आहे. पण जेव्हा महाराष्ट्राची तुलना जगाशी केली जाते, तेव्हा तुम्ही हे पाहिलं पाहिजे कि त्या-त्या देशाच्या केंद्र सरकारने तेथे आर्थिक पॅकेज दिले होते. लॉकडाऊन हे कुणालाच आवडत नाही. मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना सुद्धा आवडत नाही, पण काही आपत्कालीन परिस्थितीत असे निर्णय घ्यावे लागतात. सर्व राजकीय पक्षांनी आणि महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांनी एकत्र येऊन सरकारला सहकार्य केलं पाहिजे. काही वेळा देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात", असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchang 15 May 2026 : आजचे पंचांग! शनि जयंती, अमावस्या आणि शुभ मुहूर्त; जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण राशीभविष्य

Weekend Breakfast Special: रोजच्या पराठ्यांना द्या हेल्दी ट्विस्ट! वीकेंडला ट्राय करा पनीर स्टफ्ड बीटरूट पराठा

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १६ मे २०२६ ते २२ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

SCROLL FOR NEXT