मुंबई

राज्यातच नव्हे, देशाला लॉकडाउनशिवाय पर्याय नाही- संजय राऊत

विराज भागवत

राज्यात शनिवारी कोरोनाच्या वाढत्या प्रभावावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्वपक्षीय बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीचे नेतृत्व केलं आणि कोरोनाची साखळी तोडायची असेल तर त्यासाठी लॉकडाउनशिवाय पर्याय नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. या बैठकीत उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण लॉकडाउनचा विरोध केला. व्यापारी आणि इतर छोट्या घटकांचा विचार करत त्यांनी लॉकडाउन अमान्य केला. त्या मुद्द्यावरून आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

"राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, भैय्याजी जोशी हे कोरोनाने ग्रस्त आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्षातल्या लोकांना कोरोना होणार नाही हे विरोधकांनी डोक्यातून काढून टाकावं. सध्या राज्याचीच नाही तर देशाची परिस्थिती गंभीर आहे. परिस्थिती हाताबाहेर गेलीय म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. त्यातच राज्यची परिस्थितीही बिकट आहे. कालच्या बैठकीचं गांभीर्य सर्वांना समजलं पाहिजे. मला असं वाटतं की केवळ राज्यातच नव्हे तर देशात लॉकडाउनशिवाय पर्याय नाही", असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

"देशाची अवस्था पाहता देशपातळीवर लॉकडाउनसारखी पावलं उचलण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण एका गोष्टीचं वाइट वाटतं की केंद्र सरकार हे आपला स्वार्थ पाहून निर्णय घेतं. सध्या निवडणुका आहेत म्हणून लॉकडाउनचा विचार केला जात नाहीये. पण निवडणुका आहेत म्हणून माणूस मारता येणार नाही. कारण जीव महत्त्वाचा आहे. राजकारीण कधीही करता येइल. बंगालमध्ये कोरोना नाही असं आता वाटतंय पण नंतर परिस्थिती भीषण असेल", असा इशारा त्यांनी दिला.

सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले...

- आठ दिवस कडक निर्बंध असले पाहिजेत हे माझं मत आहे.
- सर्वांना थोडी कळ सोसावी लागेल.
- मी लसीचे दोन डोस घेतले तरीही माझ्या शरिरात अँटीबॉडिज नाहीत, मग लस खरंच काम करते आहे का? हा मोठा प्रश्नच आहे?
- पुढच्या दोन दिवसात आपण प्लान करू आणि कडक निर्बंध करायचा विचार करू
- सगळे व्यापारी आपले आहेत आपल्याला त्यांचा पण विचार करावा लागेल पण गरज पडली तर कडक निर्बंध लावावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : गौतम गंभीर चूक सुधारणार, Vaibhav Sooryavanshi ला संधी देणार! इंग्लंडविरुद्ध तगडी प्लेइंग इलेव्हन...

Lalitpur Silk Saree: बनारसी-कांजीवरमच्या गर्दीत हरवलेला बुंदेलखंडचा खजिना! ललितपूरची झरी सिल्क साडी का आहे खास?

Latest Marathi News Live Update : पुण्यात गव्यामुळे एकच खळबळ! कॅनलमध्ये अडकलेल्या गव्याला वाचवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

Kolhapur BJP Corporator : कोल्हापुरात राजकीय भूकंप? भाजपच्या रिंकू देसाईंचे नगरसेवकपद धोक्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ; नेमकं काय घडलं?

Railway: मध्य रेल्वेकडून दिलासा! विठुरायाच्या दर्शनासाठी ५४ विशेष गाड्या; तिकीट बुकिंग कधीपासून सुरू होणार? तारीख समोर, पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT