pali gram panchayat 
मुंबई

पाली ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश बालके यांचे सरपंचपद रद्द

अमित गवळे

पाली : पाली ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे पद रद्द करण्यात आले आहे. सरपंच गणेश विश्वनाथ यांनी सार्वत्रिक निवडणूक सप्टेंबर 2018 मध्ये राखीव प्रवर्गातून लढवली होती. निवडून आलेल्या दिनांकापासून विहित मुदतीत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी गुरुवारी (ता. 1) आदेश काढून त्यांचे सरपंचपद रद्द केले आहे. याबाबत पाली ग्रामपंचायत सदस्य भास्कर केशव दुर्गे व इतर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. 

ग्रामपंचायत पालीचे सरपंच गणेश बालके यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर केलेले आहे किंवा कसे, याबाबत आवश्‍यक ती पडताळणी करून अहवाल सादर करण्याबाबत तहसीलदार सुधागड यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने तहसीलदार सुधागड यांनी अहवाल सादर केला आहे, की सरपंच गणेश बालके यांची जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत संपुष्टात आलेली असून त्यांनी आजपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. गणेश बालके हे कोळी महादेव या अनुसूचित जमातीचे नसल्याने त्यांच्या त्याबाबतचा दावा अवैध घोषित करण्यात आलेला असून त्यांना कार्यकारी दंडाधिकारी सुधागड यांनी कोळी महादेव या अनुसूचित जमातीचे निर्गमित केलेले प्रमाणपत्र हे रद्द करून जप्त करण्यात आले असल्याचे पाली तहसीलदारांनी कळवले.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3) चे कलम 10-1 (अ) नुसार गणेश बालके यांचे सरपंचपद रद्द करण्याबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. 1) आदेश दिले. 

(संपादन : वैभव गाटे)

Sarpanch of Pali Gram Panchayat Ganesh Balke Sarpanch post canceled

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT