High-Court-Mumbai
High-Court-Mumbai 
मुंबई

निवडून आलेल्या सरपंचालाही मतदानाचा अधिकार

सकाळवृत्तसेवा

मुंबई - थेट निवडून आलेल्या सरपंचालाही उप सरपंचाच्या निवडणुकीत सदस्य म्हणून मत देण्याचा, तसेच समान मते पडल्यास दुसरे मत देण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला. दरम्यान, या आदेशासोबतच कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुक्‍यातील अब्दुलाट ग्रामपंचायतीची उप सरपंचपदाची निवडणूक रद्द करून नव्याने घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले.

ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार थेट सरपंच म्हणून निवडून आलेल्या सरपंचाला उप सरपंचाच्या निवडणुकीत सदस्य म्हणून मतदान करण्यास मनाई केली होती. या निर्णयामुळे शिरोळ तालुक्‍यातील अब्दुलाट ग्रामपंचायतीच्या उप सरपंचपदाच्या निवडणुकीत कल्लपा कुमटोळे यांचा एका मताने पराभव झाला होता. या निर्णयाविरोधात सरपंच पांडुरंग मोरे आणि कल्लपा कुमटोळे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्या. शंतनू खेमकर आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली.

थेट सरपंच म्हणून निवडून आलेली व्यक्ती ग्रामपंचायतीची सदस्य असल्याने उप सरपंचपदाच्या निवडणुकीत सदस्य म्हणून मतदान करण्याचा त्यांना अधिकार आहे, असा युक्तिवाद केला. तसेच निवडणुकीत समान मते पडली तर निर्णायक म्हणून दुसरे मत देण्याचा अधिकार सरपंचाला आहे, असा युक्तिवाद केला. खंडपीठाने हा युक्तिवाद मान्य करत नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT