सावित्रीबाई फुले नाट्यगृह
सावित्रीबाई फुले नाट्यगृह 
मुंबई

सावित्रीबाई फुले नाट्यगृह निवडणुकीसाठी राहणार बंद

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : २१ ऑक्‍टोबरला राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. डोंबिवली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सावित्रीबाई फुले नाट्यगृह, तर कल्याण ग्रामीण मतदारसंघासाठी तरण तलाव येथे मतमोजणी होणार आहे. या कामासाठी सावित्रीबाई फुले नाट्यगृह पुढील १३ दिवसांसाठी, तर तरण तलाव ३ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 

सोमवारपासून (ता.१४) नाट्यगृह आणि तरण तलाव बंद करण्यात आले असून नाट्यगृहात सध्या निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच मतदान पार पडल्यानंतर येथे मतपेट्या ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे येथे त्रिस्तरीय पोलिस बंदोबस्त राहणार आहे. या भागात कोणालाही प्रवेश देण्यात येणार नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयराम पवार यांनी दिली. नाट्यगृह तेरा दिवस बंद राहाणार असले तरी तरण तलाव केवळ तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT