School bus service will expensive Decision of schools Navi Mumbai due to increase in fuel prices
School bus service will expensive Decision of schools Navi Mumbai due to increase in fuel prices sakal
मुंबई

स्‍कूल बस सेवा महागणार!

सकाळ वृत्तसेवा

वाशी : कोरोनामुळे अनेक शाळांनी दोन वर्षांपासून शैक्षणिक शुल्कात वाढ केली नव्हती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक शाळांनी यंदा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला असून याबाबत पालकांना कळवले आहे. इंधनाचे दर वाढल्याने शाळेच्या बस भाड्यातही वाढ होणार असल्याची सूचना पालकांना देण्यात आली आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त पालकांना शैक्षणिक शुल्कवाढीमुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्‍याने ते चिंतेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घेण्यात आला होता. यावेळी अनेकांचे रोजगार व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्‍याने उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू होते.

अनेक शाळांनी दोन वर्षांत शुल्कात वाढ केलेली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा, महाविद्यालये सुरळीत सुरू झाली असून पुढील शैक्षणिक वर्षात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा प्रशासनाने याबाबत पालकांना सूचना दिल्‍या आहेत; परंतु यंदाही शैक्षणिक शुल्कात वाढ करू नये, अशी विनंती पालकांकडून केली जात आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत असून शालेय विद्यार्थ्यांचा बस प्रवासही महागणार असून याबाबतदेखील पालकांना सूचना देण्यात आली आहे. शैक्षणिक शुल्कात होणारी वाढ आणि शालेय बसचा महागणारा प्रवास यामुळे पालकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. आता मुलांचा बस प्रवास महागल्याने पालक चिंतेत आहेत.

फी पाच हजारांनी वाढणार

प्रत्येक शाळेने आपले शैक्षणिक शुल्क निर्धारित केले आहे. शुल्क अधिनियम कायद्यानुसार, शैक्षणिक शुल्कात दर दोन वर्षांनी १५ टक्के वाढ केली जाते; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांत शैक्षणिक शुल्कात वाढ झाली नसून अनेक शाळांचे या काळातील शुल्कही वसूल झालेले नाही. त्यामुळे साधारण शुल्कामध्ये पाच हजारांपर्यंत वाढ होणे अटळ मानले जात आहे.

शाळांनी शासनाचे नियम डावलून स्‍कूल बसच्या दरात किंवा शैक्षणिक शुल्‍का वाढ करणे गैर आहे. याप्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई

कोरोनामुळे अनेकजण आर्थिक अडचणीत आहेत. शाळेचे शुल्क आणि शालेय बसचा प्रवास, यामुळे पालक आर्थिक संकटात सापडणार आहेत.

- उमेश दिवटे, पालक

इंधन दरवाढीचा फटका

इंधनाचे दर गगनाला भिडले असून वाहनांच्या दुरुस्तीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे बस प्रवासदेखील महागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT