Assembly Elections 2024 sakal
मुंबई

Assembly Elections 2024 : उल्हासनगरात विधानसभेपुर्वीच कालानींना धक्का, NCPच्या सीमा आहुजांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Assembly Elections 2024 : उल्हासनगरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष सीमा आहुजा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे ओमी कालानींना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्ष सीमा आहुजा यांनी त्यांचे पती उद्योगपती महेश आहुजा यांच्यासह असंख्य समर्थकांसोबत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.त्यामुळे कालानींना धक्का बसला आहे.

टीम ओमी कालानीचे सर्वेसर्वा ओमी कालानी यांची पत्नी पंचम कालानी ह्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या असून सीमा आहुजा यांच्यावर महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.ओमी कालानी यांनी यंदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कडून उल्हासनगर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ते पक्षश्रेष्ठींकडे तिकीट मागणार आहेत.त्यांनी तशी मोर्चेबांधणी सुरू केली असून पप्पू कालानी हे प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.

असे सकारात्मक वातावरण असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या महिला अध्यक्ष सीमा आहुजा,उद्योगपती महेश आहुजा,कमल केशवाणी,मनोज चव्हाण यांनी शनिवारी टिळक भवन येथे असंख्य समर्थकांसमवेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे,आ.राजेश राठोड,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्जा,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन)नाना गावंडे,उल्हासनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे,प्रदेश प्रवक्ते मदन जाधव,प्रमोद डोंगरे,ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके,नाणीक आहुजा,काँग्रेस सेवादल अध्यक्ष शंकर आहुजा,पदाधिकारी वामदेव भोयर,दीपक सोनावणे,निलेश जाधव,निहाल रुपेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT