Cyber Criminal
Cyber Criminal 
मुंबई

सायबर गुन्हेगारांचे ज्येष्ठ नागरिक लक्ष्य

सकाळवृत्तसेवा

मुंबई - सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल कॉलद्वारे अधिकाधिक लक्ष्य केले जात आहे. जन्मभराची मिळकत गमावल्यामुळे त्यांच्यापुढे मोठ्या समस्या उभ्या राहत आहेत. असे दूरध्वनी आल्यास ज्येष्ठ नागरिकांनी बॅंक खात्यातील अथवा एटीएमची माहिती मोबाईलवर देऊ नये. मुले अथवा देखभाल करणाऱ्या व्यक्तीला बॅंकेत पाठवून बॅंकेची कामे करावीत, असा सल्ला सायबरतज्ज्ञांनी दिला आहे.

चांगला विमा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली दहिसरमधील 64 वर्षीय व्यक्तीची 14 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. वर्षभरापासून आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधून विविध बॅंक खात्यांत पैसे जमा करायला भाग पाडले. विशेष म्हणजे हा सर्व संवाद फक्त मोबाईलवर झाला. बोलण्यात पटाईत असलेल्या आरोपींनी या तक्रारदाराला नामवंत विमा कंपनी व म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्याची बतावणी केली. सायबरतज्ज्ञ ऍड. विक्की शाह म्हणाले, की आरोग्याच्या कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकांना बॅंकेत प्रत्यक्ष जाता येत नाही. त्याचाच फायदा उचलून आरोपी फोनवर बॅंकेचे काम होईल, असे सांगून सायबर फसवणूक करतात. आणखी एका घटनेत, लष्करातून निवृत्त झालेल्या 75 वर्षीय व्यक्तीला सायबर गुन्हेगारांनी बॅंक अधिकारी असल्याचे सांगून बॅंक खात्यावर डल्ला मारला. जूनमधील या घटनेत तक्रारदाराचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्याची भीती दाखवून आरोपींनी त्यांचा ओटीपी क्रमांक माहिती करून घेतला. त्याच्या साह्याने तक्रारदारांची पेन्शन खात्यातील 40 हजारांची रक्कम काढून घेतली. याप्रकरणी मुंबईतील मेघवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT