dinkar raikar passes away
dinkar raikar passes away google
मुंबई

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन

सकाळ डिजिटल टीम

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे गुरूवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांच्यावर मुंबईच्या नानावटी उपचार सुरु होते. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मराठी पत्रकारितेत ५० वर्षांहून अधिक काळ योगदान दिले.

दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि करोना झाला होता. उपचारानंतर डेंग्यू बरा झाला मात्र फुफ्फुसांचा संसर्ग जास्त होता. त्यामुळे नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती. मात्र शुक्रवारी पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिनकर रायकर यांना पत्रकारिता क्षेत्रात ५० वर्षांहून जास्त अनुभव होता. सध्या ते लोकमत वृत्तपत्र समूहात समन्वय संपादक म्हणून कार्यरत होते. तसेच गेली काही वर्षे ते लोकमतचे समूह संपादक म्हणूनही कार्यरत होते.त्यांनी इंडियन एक्स्प्रेस, लोकसत्ताचे सहाय्यक संपादक, दैनिक लोकमत आणि लोकमत टाईम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांना पुढारीकार ग गो जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटर इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रायकर यांना आदरांजली वाहिली, ते म्हणाले, ज्येष्ठ पत्रकार, साक्षेपी संपादक दिनकर रायकर यांचे निधन दुःखदायक आहे. जगन्मित्र अशी ओळख असलेले रायकर पत्रकारितेत शब्दांची जुळवणूक करताना माणसंही जोडत गेले ! त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : हनुमानाची भूमी काँग्रेसला माफ करणार नाही- पीएम मोदी

SCROLL FOR NEXT