मुंबई

संजय निरूपम यांची उचलबांगडी होणार? 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनानंतर मुंबई कॉंग्रेसमधील घडामोडींना वेग आला असून, राजकीय भूकंपाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांची उचलबांगडी होणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. कामत गटाचे निष्ठावंत जनार्दन चांदूरकर यांनी रविवारी कॉंग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेत गटबाजीबाबत चर्चा केली. या बैठकीत निरूपम यांच्या जागी राहुल गांधी यांचे निकटवर्ती मिलिंद देवरा यांची निवड करावी, अशी मागणीही त्यांनी केल्याचे समजते. 

निरूपम यांच्या एककल्ली कारभारावर बोट ठेवून यापूर्वी कृष्ण हेगडे, राजहंस सिंह, समीर देसाई आदी कॉंग्रेसमधून बाहेर पडल्याचे बोलले जाते. त्याच वाटेवर कृपाशंकर सिंह असताना कामत यांच्या निधनाने कामत गटाच्या निष्ठावंतांना वाली उरला नाही. त्यामुळे मुंबई कॉंग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्याची चर्चा आहे. अशा कठीण परिस्थितीत कॉंग्रेस सावरली पाहिजे, यासाठी अध्यक्ष बदलला पाहिजे, अशी भूमिका कामत गटाने घेतल्याचे समजते. याबाबत प्रभारी खरगे यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना परिस्थिती सांगावी, अशी मागणी या गटाकडून होत आहे. दरम्यान, संजय निरूपम यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला. 

गुरुदास कामत यांच्या निधनानंतर मुंबई कॉंग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. पक्ष अधिक बळकट होण्याची गरज आहे. ही भावना राहुल गांधी यांच्या कानावर घालण्यासाठी खरगे यांची भेट घेतली आहे. राहुल यांनी दिलेल्या नेतृत्वाखाली आम्ही काम करण्यास तयार आहोत. 
- जनार्दन चांदूरकर, ज्येष्ठ नेते, कॉंग्रेस. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT