मुंबई

काही वर्ष कोरोना राहाणार असं WHO ने सांगितल्यानंतर रुग्णालयांबाबत 'अशी' उचलली जाणार पावलं...

सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता. 15 : कोरोना रुग्णाची लाट ओसरली तरी हा आजार किमान काही वर्ष कायम राहाणार आहे. त्यामुळे या आजारासाठी महानगर पालिकेच्या रुग्णांमध्ये स्वतंत्र वॉर्ड तयार केला जाण्याची शक्‍यता आहे. या वॉर्डचा इतर रुग्णालयाशी फारसा संबंध येणार नाही अशी खबरदारी घेतली जाईल.

कोरोनाचा विषाणू पुढील काही महिन्यात नष्ट होण्याची शक्‍यता नाही. तर, या विषाणूचे रुग्ण पुढील काही काळ वाढत राहाणार असून त्यानंतर रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरवात होईल. मात्र, विषाणू पुर्ण पणे नष्ट होणार नाही. कोरोना बरोबर जगण्याची सवय करुन घ्यावी असे सांगत जागतिक आरोग्य संघटनेनेही हा विषाणू लवकर संपणार नसल्याचे संकेत दिले आहे.

"पुढील काही काळ कोरोनाचे रुग्ण वाढतील. त्यासाठी आवश्‍यक तयारी करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर रुग्णांची संख्या कमी होईल. रुग्ण संख्या कमी होणार असली तरी विषाणू लवकरच संपेल अशी शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे त्यादृष्टीनेही महानगर पालिकेने विचार करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी स्वतंत्र रुग्णालय तयार करावे का प्रत्येक रूग्णालयात वॉर्ड सुरु करावा असे पर्याय आहेत. त्यात, एका ठिकाणी रुग्णालय सुरु करण्याऐवजी विविध रुग्णालयात वॉर्ड सुरु करण्याचा पर्याय महापालिकेकडून स्विकारला जाऊ शकतो. या वॉर्डचा रुग्णालयातील इतर विभागाशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार आहे. हा विषाणू शिंक, थुंकीतून पसरत असल्याने प्रत्येक रुग्णाच्या खाटेचे अंतर किमान 3 ते 4 फुट ठेवावे लागणार आहे. तसेच त्यासाठी स्वतंत्र आयसीयु आणि व्हेंटीलेटरही तयार करावे लागणार आहेत.

याच बरोबर वॉर्ड मध्ये संयशीत रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र आणि रुग्णांसाठ स्वतंत्र कक्ष ठेवावे लागणार आहे. कस्तुरबा रुग्णालय हे संसर्गजन्य आजारासाठी विशेष रुग्ण आहे. मात्र, मुंबईचा वाढलेला पसरा बघात उपनगरीय रुग्णालयात कोरोनासाठी वॉर्ड तयार करण्यात येणार आहे. 

separate corona wards might built by municipal corporations because corona will stay for longer time

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT