shahapur 
मुंबई

चिंताजनक ! शहापुरमध्ये एकाचवेळी 3 नवे कोरोनाबाधित, जाणून घ्या एकूण रुग्णसंख्या

सकाळवृत्तसेवा

शहापुर : शहापूरात शुक्रवारी तीन रुग्ण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले, तर दोघे जण संशयित आहेत. शहरात एकावेळी तीन रूग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. 

शहापुरात शुक्रवारी तावडे नगर येथे एक, गोठेघर येथे एक आणि कसारा येथे विलगीकरण कक्षात एक असे तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर कसारा येथील विलागीकरण कक्षातील अन्य दोघे जण संशयित असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, तीन बाधित रुग्णांना ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी सांगितले.

बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना कसारा येथील शेट्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात व दहागाव येथील आदिवासी आश्रमशाळेत क्वारोंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान,  शहापूरमध्ये प्रतिबंधित क्षेत्राचा आरोग्य विभागाकडून पुन्हा सर्वेक्षण सुरु आहे. शहापूर, गोठेघर व कसाऱ्यात आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या वास्तव्याच्या ठिकाणाला केंद्रबिंदू ठरवून हे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. हा सर्व्हे पुढील 14 दिवस चालणार आहे.

 In Shahapur, 3 new corona patients and two suspected patients


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School Strike : पालकांनो नोंद घ्या! 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील 'या' शाळा राहणार बंद; शिक्षक समन्वय संघाचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

Smart Meter Maharashtra : स्मार्ट मीटरला भाजपच्या मंत्री आमदारांचाच विरोध, ग्रामीण भागात रोष वाढला; स्मार्ट मीटर बसवणे बंद होणार? ऊर्जा मंत्रीचे स्पष्टीकरण

FIFA World Cup 2026 : 16 वर्षांनंतर स्पेनची बाद फेरीत दमदार एन्ट्री! ऑस्ट्रियाला 3-0 ने हरवत राऊंड ऑफ 16 गाठलं

Latest Marathi Live Update: राष्ट्रीय कामाच्या नावाखाली शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम

Khadakwasala Dam Water : खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा वाढू लागला; चार दिवसांच्या पावसाने नेमका काय बदल घडवला?

SCROLL FOR NEXT