Sharad Pawar behind Shiv Sena split Kesarkar allegation mumbai sakal
मुंबई

शिवसेनेच्या फुटीमागे शरद पवार; केसरकर यांचा आरोप

शिंदे गटाचे केसरकर यांचा आरोप; राज ठाकरेंनाही आशीर्वाद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेच्या आतापर्यंतच्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे केला आहे. शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीबाबत सांगितले असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत त्यांना यातना का दिल्या, हे शरद पवार यांनी जनतेला सांगावे असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत आज भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक झाली. या बैठकीत शिंदे गटाच्या वतीने सहभागी झालेल्या केसरकर यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली. छगन भुजबळ यांना स्वत: शरद पवार यांनीच शिवसेनेतून बाहेर नेले आहे. नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडताना पवार यांनी त्यांना मदत केली होती. राज ठाकरे यांच्या पाठीशी शरद पवार यांचेच आशीर्वाद होते, असे सूचक विधानही केसरकर यांनी यावेळी केले.

केसरकर आणि राणे पुत्रात यांच्यात खडाजंगी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करून भारतीय जनता पक्षाचा हाथ धरला असला तरी शिवसेनेच्या या गटात आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे कुटुंबीयांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजप नेते नीलेश राणे, नीतेश राणे यांनी ठाकरे घराण्यावर सुरु असलेली टीका आता बंद करावी, अशी अपेक्षा केसरकर यांनी नुकतीच व्यक्त केली होती. मात्र नीलेश राणे यांनी ‘दीपक केसरकर २५ दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका, असे केसरकर यांनाच सुनावले आहे. तसेच ‘केसरकर मिळतेय ती इज्जत घ्यायला शिका लायकीपेक्षा जास्त बोलू नका, असे ट्विटही नीलेश राणे केले आहे.

‘केसरकरांना भाजपची सुपारी’

शिवसेनेतील बंडामागे शरद पवार असल्याचा जावईशोध लावणारे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाजपची सुपारी घेतल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. केसरकर यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या भाष्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, की दीपक केसरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार होते याचा विसर त्यांना पडलेला आहे. शरद पवार यांच्यावर टीका करतात यातच केसरकर यांनी भाजपची सुपारी घेतली असावी असे वाटते. राज्याती बेकायदा शिंदे सरकारचे तथाकथित प्रवक्ते म्हणून ते अहंकाराने बोलत आहेत. केसरकर यांनी स्वतःचा राजकीय वारसा कायम राहावा यासाठीची ही अखेरची धडपड आहे, अशा संतप्त भावना महेश तपासे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT