मुंबई

शरद पवारच महाराष्ट्रातील राजकारणाचे 'गाॅडफादर', कसे? वाचा...

सकाळ वृत्तसेवा

अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतल्यानं राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालय. महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. दरम्यान या सर्वात महत्त्वाची बाब सातत्याने समोर येताना दिसतेय ती म्हणजे शरद पवार हेच महाराष्ट्रातील राजकारणातील गाॅडफादर असल्याचं बोललं जातंय. 

सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी दरम्यान उपस्थित आमदारांपैकी सर्वच्या सर्व आमदार आता परतल्याचं पाहायला मिळतंय. अगदी सकाळपासून नॉट रिचेबल असणारे धनंजय मुंडे हे देखील आता वाय बी चव्हाण सेंटरमध्ये परतल्याचं पाहायला मिळतंय. आता परतल्यावर धनंजय मुंडे यांनी 'मी इथेच आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. खाली आल्यावर माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया देईन" असं देखील धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

सध्या मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडतेय. या बैठकीत येताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर  येत All Is Well अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे यामध्ये शरद पवार यांच्या चाणक्यनीतीचा विजय झाल्याचं बोललं जातंय. यामध्ये अजित पवार यांचं बंड अवघ्या 12 तासात हाणून पाडलं असं देखील आता बोललं जातंय.  

कालपरवापर्यंत विरोधक म्हणून भूमिका बजावणारे अजित पवार अचानक भाजपचे मित्र कसे झाले? हाच सवाल राज्यातल्या जनतेला पडलाय. अजित पवारांच्या या भूमिकेमागे नेमकं कोणतं राजकारण आहे? यावरून राजकीय विश्लेषकही संभ्रमात पडलेत. 

Webtitle :  sharad pawar godfather of maharashtras politicics

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT