Sharad Pawar resigns as NCP chief police deployed for security politics ajit pawar supriya sule sakal
मुंबई

Sharad Pawar resigns as NCP chief : पवारांच्या राजीनाम्यानंतर सिल्वर ओक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानावर चोख पोलीस बंदोबस्त

राज्यसभा खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यसभा खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली. दक्षिण मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पक्षाचे नेते आणि आमदारांचे आगमन सुरू झाले. दरम्यान, शरद पवार यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दुसरीकडे या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काहीसे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये या साठी पोलिसांनी त्वरित शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथे चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. परिस्थिती हाताळण्यासाठी या झोनचे पोलीस उपायुक्त तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः उपस्थित होते.

सोबतच परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त दलाला पाचारण करण्यात आले होते. सिल्वर ओक यासोबतच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त वाढवलेला होता . यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी प्रतीकात्मक आंदोलन करत होते या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी बंदोबस्त लावलेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गिरणी कामगारांना हक्काचे घरं नाहीचं, सरकारकडून पुन्हा मुंबईतील घरांचे गाजर

Mini Maldives: लाखोंचा खर्च कशाला? भारतात दडलाय 'मिनी मालदीव'; हे निसर्गरम्य ठिकाण पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

कागदपत्र देण्याच्या बहाण्याने स्पर्श अन् जवळीक! महिला पोलिसाचा विनयभंग, ASIवर गुन्हा दाखल

शरियाचा फायदा घेत मुस्लिमांना ३ हजार कोटींना फसवलं; नौहेरा शेखनं काय केलं? EDने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगरमध्ये मॉकड्रिल दरम्यान हातात ग्रॅनेट फुटल्याने चार पोलीस कर्मचारी जखमी

SCROLL FOR NEXT