Court sakal
मुंबई

Mumbai News : शिखर बँक प्रकरण! प्राजक्त तनपुरे, रणजित देशमुख, अर्जुन खोतकरांना न्यायालयाकडून समन्स

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक उर्फ शिखर बँक प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची विशेष न्यायालयाने दखल घेतली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बँक उर्फ शिखर बँक प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची विशेष न्यायालयाने दखल घेतली आहे. तसेच, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्ता तनपुरे आणि त्यांचे वडील प्रसाद तनपुरे यांना समन्स बजावले.

काँग्रेस नेते रणजीत देशमुख, शिवसेना नेते अर्जुन खोतकर, बांधकाम व्यावसायिक जुगल किशोर तापडिया आणि उद्योगपती पद्माकर मुळ्ये यांच्यासह या प्रकरणातील अन्य आरोपींनाही विशेष न्यायालयाने यावेळी समन्स बजावले आहे. त्याचप्रमाणे, या सगळ्यांना 12 जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. ईडीने या प्रकरणी दाखल केलेल्या दोन पुरवणी आरोपपत्रांची विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दखल घेतली.

तसेच, आरोपींना समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश दिले. तनपुरे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च आणि तंत्रशिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री होते. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे माजी खासदार आहेत.

सहकारी साखर कारखाने आणि सहकारी सूत गिरण्यांमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरण आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट 2019 मध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवला होता. त्याच्या आधारे ईडीने या प्रकरणी कारवाई केली होती.

ईडीच्या आरोपानुसार, प्राजक्त तनपुरे यांच्या प्रसाद शुगर ॲण्ड अलाईड ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड या कंपनीला राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना हा 26.32 कोटी रुपयांऐवजी केवळ 12.95 कोटी रुपयांना विकला गेला. हा कारखाना बेकादेशीररीत्या विकत घेण्यात आला आणि त्यातील पैसे हे आर्थिक गैरव्यवहाराचे असल्याचेही आरोप पुरवणी आरोपपत्रामध्ये करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT