डोंबिवली - शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेसमोरच शिंदे गटाची बॅनरबाजी...हा विजय विचारांचा हा विजय लोकशाहीचा असा संदेश लिहिलेला बॅनर लावत शिंदे गटाने दाखवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी हटकताच कार्यकर्त्यांनी बॅनर लगेच हटविला. शिवसेना शाखेच्या उद्घाटनाच्या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
असे असले तरी शिंदे गट बॅनर घेऊन येतात लावतात देखील याकडे पोलिसांचे आधी लक्ष गेले नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज संवाद दौरा आहे.
नेवाळी नाका येथे ठाकरे गटाच्या दोन शाखा नव्याने सुरू करण्यात येत आहेत. याचे उद्घाटन आज पक्षप्रमुख ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. या निमित्ताने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत ठाकरे घटाने शक्तिप्रदर्शन केले आहे.
या शाखेच्या उद्घाटनाच्या ठिकाणीच शाखेसमोरच शिंदे गटाच्या दोन कार्यकर्त्यांनी येथे येऊन शिंदे गटाची बॅनरबाजी करण्याचा प्रयत्न केला. या बॅनरवर त्यांनी हा विजय विचारांचा, हा विजय लोकशाहीचा, ज्यासाठी केला अट्टाहास, हा विजय त्या संस्कारांचा असा संदेश लिहीत ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला गला.
शिंदे गटाचा हा बॅनर पाहताच पोलिसांनी तात्काळ तो बॅनर तेथून हटविला. मात्र पोलीस समोर बसलेले असताना शिंदे गटाचे कार्यकर्ते येऊन बॅनर ठेवतात. तरी देखील पोलिसांचे त्याकडे लक्ष जात नाही. जेव्हा इतर माणसं त्याविषयी चर्चा करतात तेव्हा पोलीस या कार्यकर्त्यांना हटकून बॅनर हटवतात. हिललाईन पोलिसांच्या या भूमिकेने साऱ्यांचेच लक्ष वेधले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.