Shivsena Banner On Raj Thackeray Sakal
मुंबई

आज हिंदू उद्या कोण? राज ठाकरेंच्या विरोधात बॅनरबाजी

राज ठाकरे यांच्या उत्तर सभेनंतर त्यांच्या भूमिकेवरुन शिवसेनेने त्यांना डिवचलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज ठाकरे यांच्या उत्तर सभेनंतर त्यांच्या भूमिकेवरुन शिवसेनेने त्यांना डिवचलं आहे. उत्तर सभेमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवाजी पार्क परिसरात शिवसेनेने बॅनर लावले आहेत. हे बॅनर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

दरम्यान, राज यांनी उत्तर सभेत हिंदुत्वाची भूमिका घेतली असून निवडणुकांच्या वेळी भाजवापर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी आता शिवसेना आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आज शिवाजी पार्क परिसरात एक बॅनर झळकला आहे. दादर येथील शिवसेना भवन जवळ लागलेल्या या बॅनरवर तीन फोटोंची जागा आहे. त्यातील एक जागा रिकामी असून तिथे प्रश्नचिन्ह देण्यात आलं आहे.

राज ठाकरेंच्या पुढील भूमिकेवरील ते प्रश्नचिन्ह असल्याचं बोललं जातंय. एका फोटोत राज यांनी डोक्यात मुस्लिम टोपी घातली आहे. या फोटोला 'काल' अशी टॅगलाईन दिली आहे. दुसऱ्या रकान्यात हनुमान असं लिहिलं असून त्यासाठी 'आज' अशी टॅगलाईन दिली आहे. आणि तिसऱ्या रकान्यात प्रश्नचिन्ह दिसत असून त्याला 'उद्या' अशी टॅगलाईन आपल्याला दिसत आहे. अशा आशयाचे बॅनर झळकल्याने मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान मनसेच्या पाडव्याच्या सभेतील वक्तव्यामुळे वाद पेटला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मनसेने उत्तर सभा आयोजित केली होती. या सभेत राज हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहाला मिळालं. यावेळी त्यांनी शिवसेनेवर आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर निवडणुकांच्या वेळी भाजपावर टीका करणारे आता त्यांची बाजू घेताना दिसतात अशी टीका होत आहे. यावरुनच शिवसेनेने अशा प्रकारची बॅनरबाजी केल्याचं पहायला मिळतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT