Eknath Shinde Vs Ramdas Kadam  sakal
मुंबई

Eknath Shinde Vs Ramdas Kadam : रामदास कदमांवर एकनाथ शिंदे नाराज ; बैठकीत नक्की काय घडलं ?

Eknath Shinde Vs Ramdas Kadam : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही प्रतिवाद केल्याने पक्षातील वरिष्ठ नेते कदमांवर नाराज

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde Vs Ramdas Kadam : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची बातमी समोर येत आहे. साम वृत्तवाहिनीने ही बातमी प्रसारीत केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेनेचे फायर ब्रँड नेते तथा विरोधकांवर नेहमीच टीका करणारे माजी मंत्री रामदास कदम हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि विरोधकांवरच्या टीकांमुळे नेहेमीच चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ते खोटारडे असल्याची टीका केली होती.

नुकतीच 16 तारखेला शिवसेनेची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये शिवसेनेचे नेते मंत्री व आमदार आणि खासदार उपस्थित होते. यावेळी रामदास कदम यांनी काही मंत्र्यांना सुनावलं. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यावर नाराज झाल्याचे वृत्त सामने दिले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांच्यावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षातून राजीनामा दिला होता. यावेळी त्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रामदास कदम यांच्यावरील नाराज असल्याचे वृत्त समोर येत आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अनेक शिवसेना पदाधिका-यांनी रामदास कदम आणि त्यांचा मुलगा सिद्धेश कदम यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्यामुळं कदम यांच्याविषयी पक्षात नाराजी असल्याची चर्चा आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही प्रतिवाद केल्याने पक्षातील वरिष्ठ नेते कदमांवर नाराज असल्याचेही म्हटले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT