Shivsena sakal
मुंबई

Shivsena: शिवसेनेने मागितला विकासकामांचा लेखाजोखा, उल्हासनगर महानगरपालिकेत धडक

Ulhasngar: पुन्हा बैठकीचे आयोजन करून लेखाजोखा सादर करणार असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी दिल्याची माहिती राजेंद्र चौधरी यांनी दिली.

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

Dr. Shrikant Shinde: खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन वर्षात उल्हासनगरातील विकासकामांसाठी शेकडो कोटींचा निधी दिलेला आहे.शिवसेनेने महानगरपालिकेत धडक देऊन या निधीतील सद्यस्थितीतील विकासकामांचा लेखाजोखा मागितला.

शिवसेनेचे शिष्टमंडळ येताच आयुक्त डॉ.अझिझ शेख यांच्या आदेशनव्ये अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार राजेंद्र चौधरी,दिलीप गायकवाड,नाना बागुल,कलवंतसिंह सोहता,स्वप्नील बागुल,बाळा श्रीखंडे,सुरेश सोनवणे या बैठकीला उपस्थित होते.

तेंव्हा शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीच्या विकास कामांची सद्यस्थिती काय आहे व किती कामे पूर्ण झाली आहेत तसेच कोणत्या कामाच्या वर्क ऑर्डर दिल्यात.

तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुलाचे काम कुठपर्यंत आले.एमएमआरडीएचे रस्ते वाहतुकीसाठी कधी खुले करणार,खड्डे कधी भरणार आदी विकासकामांचा लेखाजोखा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मागितला.त्यावर 15 दिवसात सद्यस्थितीतील सर्व विकासकामांची माहिती घेऊन आणि पुन्हा बैठकीचे आयोजन करून लेखाजोखा सादर करणार असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी दिल्याची माहिती राजेंद्र चौधरी यांनी दिली.

या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता तरुण शेवकानी,पाणी पुरवठ्याचे अभियंता परमेश्वर बुडगे,उपअभियंता दीपक ढोले,उद्यान अधीक्षक दीप्ती पवार,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अश्विनी आहुजा,शरद प्रधान आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT