शिवशाहींं
शिवशाहींं 
मुंबई

नादुरुस्त शिवशाहींंनी स्थानके भरली, अवैध धंद्यांना ऊत

प्रशांत कांबळे

मुंबई ः मुंबई, पुणे, सातारा, कात्रज बस स्थानकांसह राज्यातील अनेक स्थानकांवर भंगार स्थितीत खासगी शिवशाही गाड्या उभ्या आहेत. चक्क महामंडळाच्या परिसरातच उभ्या गाड्यांचे पार्ट चोरीला जात असून, अवैध धंद्यांनाही ऊत आला आहे. त्यामुळे अशा भंगार खासगी गाड्यांबाबत सोशल माध्यमांवर टीका होत आहे. 


खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत एसटीच्या सर्वसामान्य प्रवाशांना आरामदायक आणि स्वस्त प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाने 2016 मध्ये शिवशाही गाड्या रस्त्यांवर आणल्या. यामध्ये महामंडळाच्या मालकीच्या 500 तर खासगी 500 अशा एकूण एक हजार गाड्या राज्यात धावत होत्या; मात्र गंभीर अपघातांमुळे प्रवाशांनी शिवशाहीकडे पाठ फिरवली. त्यामुळे महामंडळाची शिवशाही योजना फसली.

आता लॉकडाऊन काळात एसटी राज्यभरात बंदच पडल्याने महामंडळाच्या बसस्थानकांवर खासगी शिवशाहींनी जागा व्यापल्या आहेत, तर महामंडळाच्या मालकीच्या बसही नादुरुस्त अवस्थेत उभ्या आहेत. यामध्ये पुण्यातील स्वारगेट परिसरातील भगीरत कंत्राटदारांच्या भंगार शिवशाही गाड्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाले असून, राज्यभरातही सारखीच परिस्थिती असल्याने एसटीची प्रतिमा डागाळली जात असल्याची टीकाही सोशल माध्यमांवर केली जात आहे. 

सध्या एसटीच्या मालकीच्या शिवशाही चलनात आहेत. खासगी शिवशाही गाड्या अद्याप वापरण्यात नाहीत; मात्र हळूहळू त्याचा वापर सुरू करण्याचा विचार आहे. त्यामुळे या गाड्या एसटीच्या परिसरात उभ्या आहेत; मात्र गाड्यांचा वापर अवैध धंद्यांसाठी होत असल्यास त्याची माहिती घ्यावी लागेल. 
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ 

गेले वर्षभर बसस्थानकात अत्यंत दुरवस्थेत उभ्या असलेल्या या शिवशाही बस एसटीच्या मालकीच्या नसतानाही बसस्थानकांत उभ्या आहेत. त्यामुळे अशा गाड्या बसस्थानकातून खासगी बसमालकांनी इतरत्र ठेवाव्या. 
- रोहित धेंडे, एसटी प्रवासी 

(संपादन- बापू सावंत)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT