महाड : दिवाळीच्‍या कपडे खरेदीसाठी ग्राहकांनी केलेली गर्दी.
महाड : दिवाळीच्‍या कपडे खरेदीसाठी ग्राहकांनी केलेली गर्दी. 
मुंबई

मंदीतही जिल्ह्यात दिवाळीची कपडे खरेदी जोरात सुरू

सकाळ वृत्तसेवा

महाड (बातमीदार) : दिवाळी म्हटली की, कपड्यांची खरेदी ही आलीच. गरीब असो वा श्रीमंत दिवाळीत कपड्यांच्या खरेदीसाठी सर्वजण कुटुंबासह बाहेर पडताना दिसत आहेत. तरुणाईही नवनवीन आधुनिक फॅशनच्या शोधात जिल्ह्यातील कापड दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. दिवाळीच्या हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये तब्बल ३० कोटी रुपयांची उलाढाल कपडे व्यवसायातून होत आहे.

दिवाळीत कपडे खरेदीमध्ये महिला, लहान मुले व तरुणांचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो. याचाच फायदा घेत जिल्ह्यातील सुमारे दीड हजार कपड्यांची दुकाने आधुनिक कपड्यांनी सजलेली आहेत. कपड्यांचे नवनवीन शेकडो प्रकार बाजारात आलेले आहेत. चांगल्या दर्जाची ड्रेस मटेरियल, तसेच तयार कपडेही बाजारात आल्याने ग्राहकांची दुकानांमध्ये गर्दी उसळलेली आहे. 

तरुणांमध्ये अनेक फॅशनचे कपडे बाजारात आल्याने खासकरून तरुणाईंची दुकानांमध्ये अधिक प्रमाणात गर्दी दिसत आहे. टी-शर्ट, शर्ट, ट्राऊझर, जीन्स दिवाळीमध्ये पहिल्या दिवशी, तसेच भाऊबीज, धनत्रयोदशीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे लागत असल्याने हे कपडे खरेदी करण्यासाठी अनेक प्रकारही उपलब्ध झालेले आहेत.
प्रत्येक दुकानात एका कुटुंबातील पाच-सहा जण खरेदी करत असल्याने ५ ते १० हजार रुपयांपर्यंत ग्राहकाचे बिल होत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये या दिवाळी हंगामात तब्बल ३० कोटी रुपयांची उलाढाल या दुकानांमध्ये होत असते. स्थानिक दुकानदारांबरोबरच ब्रॅण्डेड कंपन्याच्या शोरूममध्येही चांगली वर्दळ दिसत आहे. तयार कपड्यांचे किमान दर १ हजारापासून सुरू होते. इतर व्यवसायात मंदीचे वातावरण असले, तरी कपडे गरजेचे असल्याने त्यामध्ये मात्र ग्राहकांचा कल अधिक प्रमाणात दिसत आहे.

महिलांसाठी पर्वणीच
दिवाळीची खरेदी म्हणजे महिलांसाठी पर्वणीच असते. त्यामुळे महिलांचा दुकानांमध्ये वावर वाढलेला आहे. साड्या, विविध प्रकारचे ड्रेस, सलवार सूट, अनारकली, गाऊन, कुर्ती, खासणांसाठी वापरले जाणारे कपडे, लेगीज याला महिलांची विशेष मागणी आहे. प्लाझो, स्कर्ट, फ्रॉक स्टाईल व जॅकेट स्टाईल कुर्ता यामध्येही महिलांसाठी आकर्षक प्रकार बाजारात आले आहेत. 

दिवाळीत फॅशनचे व ताजा माल दुकानात येत असल्याने ग्राहकांची गर्दी वाढते. दिवाळी असल्याने खरेदीदारही फारसा विचार करत नाही.
- दिनेश जैन, व्यापारी

दिवाळीत कपडे खरेदीचा आनंद वेगळा असतो. चार दिवस नवीन कपडे घालून धम्माल करायला मिळते. चांगल्या दर्जाचे व नवीन कपडे या काळात मिळतात.
- अनिकेत राव, तरुण
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT