MP Shrikant Shinde Sakal
मुंबई

MP Shrikant Shinde : श्री मलंगगड हरिनाम महोत्सवात खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी टाळ मृदुंगावर वारकऱ्यांसमवेत धरला ठेका

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या मंगळवारपासून राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - हरिभक्त यांची मांदियाळी भजनांवर फुगडी चा धरलेला घेर मनोरे ह.भ.प. महाराजांच्या रसाळ वाणीतले कीर्तन टाळ मृदुंगाचा नाद अशा मंगलमय वातावरणात श्रीमलंगड येथील हरिनाम सप्ताहातील भक्तीरसात वारकरी तल्लीन झाले आहेत. श्री मलंगगडाच्या पायथ्याशी सुरू असणाऱ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशी दिसून आले.

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी रविवार श्रीमलंगगड महोत्सवात सहभागी होऊन सर्व वारकरी बांधवांसोबत कीर्तनाचा आनंद घेतला. वारकऱ्यांसोबत टाळ मृदुंगाच्या तालावर खासदार डॉ. शिंदे यांनी देखील ठेका घेत हरिनामाचा जागर केला. यावेळी बीड येथील ह.भ. प. महादेव महाराज राऊत यांचे कीर्तनही पार पडले. यावेळी हजारोंच्या संख्येने वारकरी बांधव उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या मंगळवारपासून हा राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे. ज्यामध्ये वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्राच्या विविध प्रांतातील अनेक मोठमोठे कीर्तनकार सहभागी झाले आहेत. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशी बीड येथील ह.भ. प. महादेव महाराज राऊत यांचे कीर्तन झाले.

आपला महाराष्ट्र इतका संस्कृतीने संपन्न का आहे, याचे एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रात कीर्तनकार आहेत, महाराष्ट्रात संत आहेत म्हणूनच महाराष्ट्र सुसंस्कृत असल्याचे परमपूज्य ह. भ. प. महादेव महाराजांनी यावेळी सांगितले. तसेच देशाच्या कोणत्याही भागामध्ये कीर्तनाचा इतका मोठा कार्यक्रम अजिबात होत नसल्याचे प्रतिपादनही यावेळी महाराजांनी केले. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी हाती टाळ घेत सर्व वारकरी बांधवांसोबत कीर्तनाचा आनंद घेतला.

यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी फुगडी खेळत विविध भजनाच्या तालावर वारकरी नृत्यही केले. यावेळी त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनीही या कीर्तन महोत्सवात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर, बीड जिल्ह्याचे नेते प्रा. सुरेश नवले, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT