BMC Rajawadi Hospital sakal
मुंबई

धक्कादायक! उंदराने डोळे कुरतडलेल्या रुग्णाचा मृत्यू

राजावाडी रुग्णालयात सुरू होते उपचार

भाग्यश्री भुवड

राजावाडी रुग्णालयात(Rajawadi Hospital)उंदराने डोळे कुरतडलेल्या(Rat Bite)श्रीनिवास यल्लपा या तरुणाचा उपचारादरम्यान संध्याकाळी 6 वाजता मृत्यू झाला आहे.

मुंबई : राजावाडी रुग्णालयात(Rajawadi Hospital)उंदराने डोळे कुरतडलेल्या(Rat Bite)श्रीनिवास यल्लपा या तरुणाचा उपचारादरम्यान संध्याकाळी 6 वाजता मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मेंदुज्वर झाला होता तसेच त्याचे लिव्हर देखील खराब झाले होते. यासाठी गेल्या तीन दिवसांपासून त्याच्यावर राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते .अखेर आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. (Shrinivas yellappa dead in rajawadi hospital due to bite of rat over his eye)

मंगळवारी संध्याकाळी या रुग्णाचे उंदराने डोळा कुरतडल्याचे समोर आले होते. त्यानंतर, राजावाडी रुग्णालय प्रशासनाला अनेक स्तरावरुन झालेल्या टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, आज या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान, या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. श्रीनिवासची मोठी बहिण यशोदा यल्लप्पा बुधवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून रुग्णालयाच्या गेटवर उभी होती. श्रीनिवासला भेटण्याची मागणी करत होती. पण, रुग्णालयाकडुन रात्री 8 वाजता त्याच्या मृत्यूची बातमी दिल्याचे यशोदा यांनी साांगितले. हा प्रसंग सांगताना यशोदा यांचे अश्रू अनावर झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा विमानसेवेवर मोठा परिणाम; उड्डाणे आणि लँडिंग प्रक्रियेत अडथळे

SCROLL FOR NEXT