मुंबई

'सिमेन्स'मुळे प्रवास होणार वेगवान

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हार्बर मार्गवर सर्व लोकल सिमेन्स लोकल धावण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील जुन्या रेट्रोफिटेड बनावटीच्या लोकल बाद झाल्या असून, या लोकल भंगारात जाण्याची शक्यता आहे.

हार्बर मार्गावर सध्या 40 लोकल असून, या लोकलच्या 612 फेऱ्या चालविण्यात येतात. रेट्रोफिटेडच्या लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना त्रासदायक होत होते. त्यामुळे प्रवाशांच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे हार्बर मार्गावर सर्व लोकल सिमेन्स कंपनीच्या चालविण्यात येत आहे. या सिमेन्स लोकलमुळे पावसाळ्यात लोकलला मिळणारा ब्रेक यंदा मिळणार नसल्याचे दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

पावसाळ्यात रुळावर पाणी साचून रेट्रोफिटेड कंपनीच्या लोकल ठप्प होतात. त्यामानाने सीमेन्स बनावटीच्या लोकल साचलेल्या पाण्यातून चालविता येऊ शकतात. सिमेन्स लोकलची बांधणी आधुनिक पद्धतीने असल्यामुळे खिडक्या आणि दरवाजे मोठ्या आकाराचे असणार आहेत. या लोकलचा वेग 80 ते 100 किमी असल्याने  दोन स्थानकांमधील अंतर कमी वेळात पार करणे शक्य झाले. दिवसभरात एक रेक साधारणपणे 10 फेऱ्या पूर्ण करतात. यामुळे वेळापत्रकाची चाचपणी करून फेऱ्या वाढवण्याचे नियोजन असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु ज्याप्रमाणे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे मुख्य मार्गावर नव्या लोकल गेल्या काही वर्षांत दाखल झाल्या. त्या तुलनेत हार्बर मार्ग उपेक्षितच राहिला. आता मात्र हार्बर रेल्वे प्रवाशांना नवीन सिमेन्स लोकलचा दिलासा मिळाला आहे.

''हार्बर मार्गावर सर्वच लोकल सिमेन्स लोकल धावत आहेत. या लोकलमुळे प्रवास सुसह्य व वेगवानही होणार आहे. तसेच पावसाळ्यात सीमेन्स बनावटीच्या लोकल साचलेल्या पाण्यातून चालविणे शक्य होणार आहे''.

- अनिलकुमार जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : देशात सकाळी 11 वाजेपर्यंत 25.41 टक्के मतदानाची नोंद; महाराष्ट्रात 18.18 टक्के मतदान

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT