तेहसीन खान
तेहसीन खान 
मुंबई

...तरीही तिने सापाला सोडले नाही!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पोटच्या कन्येला सापाने दंश केला. एकदा नव्हे, तर दोनदा. तिच्या किंकाळ्या ऐकून धावलेल्या मातेने स्वतःची पर्वा न करता त्या सापाला दूर फेकण्याचा प्रयत्न केला, पण चवताळलेल्या त्या सापाने तिलाही दंश केला. तरीही तिने त्याला सोडले नाही. एका हातात घट्ट पकडले... 

आता तिच्या नजरेसमोर एकच लक्ष्य होते. कसेही करून मुलीला रुग्णालयात न्यायचे. तिला वाचवायचे. स्वतःला होत असलेल्या वेदना विसरून तिने धारावीतल्या त्या झोपडीतून मुलीला खेचतच बाहेर आणले. दुसऱ्या हातात तो दीड फुटी साप होताच. स्वतःला प्रचंड वेदना होत आहेत. मुलीवर मृत्यूची काळी छाया पडलेली आहे. अशा अवस्थेतही त्या मातेच्या ध्यानात एक बाब पक्की होती. त्या सापालाही डॉक्‍टरांना दाखविले पाहिजे. म्हणजे मग त्यांना तो कोणत्या जातीचा आहे ते कळेल. त्याच्या विषावर कोणते उपचार करायचे ते समजेल. 

मुलीला घेऊन ती रस्त्यावर आली. टॅक्‍सी पकडली आणि थेट शीव रुग्णालय गाठले. तेथे डॉक्‍टरांनी दोघी माय-लेकींना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल केले. त्या सापाला बरणीत बंद केले. पशुवैद्यकीय विभागातील डॉक्‍टरांनी येऊन त्याची तपासणी केली. त्यात तो साप जहरी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मग लगेचच पुढचे उपचार सुरू करण्यात आले. 

नेचरपार्कजवळील राजीव गांधी नगरमध्ये राहणाऱ्या त्या महिलेचे नाव सुलताना खान (वय ३२) असे असून, तिच्या मुलीचे नाव तेहसीन (वय १८) आहे. तेहसीन ही अजूनही आयसीयूमध्ये आहे; मात्र तिच्या जिवावरचा धोका टळला आहे. पावसामुळे त्यांच्या घरात तो विषारी साप शिरला होता. चुकून त्याला तेहसीनचा हात लागला आणि त्याने हाताला दंश केला. त्याबरोबर किंकाळी फोडून तिने त्याला झिडकारण्याचा प्रयत्न केला, तसा तो पुन्हा चावला. त्या किंकाळ्या ऐकून सुलताना धावल्या. त्या सापावर त्या तुटूनच पडल्या. पण त्याने त्यांचाही चावा घेतला. पण मुलीच्या मायेपुढे त्या सापाच्या विषाची मात्रा मात्र चालली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT