मुंबई

धक्कादायक आकडा!  मुंबईत आतापर्यंत 'इतक्या' पालिका आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

पूजा विचारे

मुंबईः कोरोना व्हायरसनं सध्या सर्वत्र विळखा घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईत शहरात या व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव झालेला पाहायला मिळाला. पण त्यातच राज्याचा आकडा पाहता सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं विविध पातळीवर प्रयत्न केलं. कोरोनाचा प्रसार मुंबई शहरात थांबवण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून अहोरात्र मेहनत घेतली. यात डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्माचारी, मुंबई पोलिस, महापालिका कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाली. या कोरोना व्हायरसनं पालिकेच्या १०८ आणि मुंबई पोलिस विभागातील ५१ जणांचा बळी घेतला आहे. 

मुंबई महापालिकेच्या विविध विभागात तब्बल २६८६  कर्मचारी कोरोनाबाधित झालेत. त्यापैकी आतापर्यंत तब्बल १०८ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी घेतलाय. आतापर्यंत कर्मचाऱ्यांबरोबरच एक उपायुक्त आणि एका सहाय्यक आयुक्तांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या तीन महिन्यांत १०८ कर्मचाऱ्यांचा बळी गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतामध्ये दोन खाते प्रमुख, कर आणि संकलन विभागाचे २, सफाई विभाग ३१, आरोग्य विभाग २७, अग्निशमन विभाग ८, सुरक्षा विभाग ७, परिमंडळ १ मध्ये ५, परिमंडळ २ मध्ये ५ तर इतर विभागातील २१ कर्मचारी अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय.

मार्च महिन्यापासून कोरोनाचा विळख्याला सुरुवात झाली. तेव्हापासून पालिकेच्या आरोग्य विभागासह विविध विभागातील कर्मचारी बाधित झालेत. सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाशी संबंधित काम देण्यात आलंय. डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार यांच्या बरोबरच अधिकारी, अभियंते, विविध विभागातील कर्मचारी, शिपाई हेही या कोरोनाच्या लढाईत उतरले. 

मुंबई पोलिस विभागातही सारखीच परिस्थिती 

मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना ड्युटी बजावत असताना कोरोनोची लागण होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. मुंबईतील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांची संख्या ५१ इतकी झाली आहे.  दरम्यान राज्यातील पोलिस दलातील कोरोनाबाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या एक हजार ५६७ झाली आहे.  त्यात १९२ अधिकारी आणि एक हजार ३७५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.  कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ८९ इतकी आहे. त्यात सात अधिकारी आणि ८२ कर्मचारी यांचा समावेश आहे.

so many municipal and police personnel in Mumbai have died due corona

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT