Boycott
Boycott 
मुंबई

पालघरमधील कुटुंबावर सामाजिक बहिष्कार?

सकाळवृत्तसेवा

पालघर - सातपाटी गावातील श्रॉफ मैदानाबाबत निर्माण झालेल्या वादात आपल्या कुटुंबाने तटस्थ भूमिका घेतली होती. त्या रागातून काही ग्रामस्थांनी सामाजिक बहिष्कार टाकला आहे, अशी तक्रार सनी अनिल चौधरी यांनी सातपाटी सागरी पोलिस ठाण्यात केली आहे.

सातपाटीतील श्रॉफ मैदानावरून वाद निर्माण झाल्यानंतर मी आणि माझे वडील अनिल चौधरी यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. त्या आकसातून ग्रामस्थांनी आमच्या घरावर दोन वेळा मोर्चा काढला आणि घोषणाबाजी व दगडफेक केली होती, असा आरोप सनी चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला. चौधरी कुटुंबीयांना बहिष्कृत करा; त्यांच्याशी व्यवहार बंद करा, असे संदेश व्हॉट्‌सॲपवरून पसरवण्यात आले, असे त्यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. गावात कोणाशीही संबंध ठेवू न देता सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

आमचा मासेमारीचा व्यवसाय आहे; परंतु गावातील मोठ्या व्यापाऱ्यांना आमच्याकडून मासे विकत घेण्यास ग्रामस्थ मज्जाव करत आहेत. आपले वडील अनिल चौधरी हे श्री राममंदिर देवस्थान विश्‍वस्त समितीवर निवडून आले होते. परंतु, ग्रामस्थांनी त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या आणि सह्यांची मोहीम राबवून त्यांना पदावरून काढून टाकले. सार्वजनिक कार्यक्रम आणि स्पर्धांमध्ये भाग घेऊ दिला जात नाही. आपली सात वर्षांची मुलगी शिकवणीला जाते; तेथील शिक्षिका व अन्य विद्यार्थ्यांनी तिच्याशी बोलणे बंद केले आहे, असे चौधरी यांचे म्हणणे आहे.

सनी चौधरी यांनी सातपाटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी केली जाईल. तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल.
- जयेश ठाकूर, पोलिस निरीक्षक, सातपाटी सागरी पोलिस ठाणे

मालकांनी श्रॉफ मैदान गावाला खेळण्यासाठी दिले आहे. अनिल चौधरी यांनी ग्रामस्थांना त्रास दिला; मुलांविरोधात खोट्या तक्रारी केल्या. आम्ही त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकलेला नाही. त्यांना मच्छीमार सहकारी संस्थेतून डिझेल आणि कर्जपुरवठा केला जातो.
- राजन मेहेर, अध्यक्ष, सातपाटी मच्छीमार सहकारी संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT