social media 
मुंबई

हा अर्थसंकल्प समजण्यापलीकडे... 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांबाबत समाजमाध्यमावर अनेक विनोदी प्रतिक्रिया उमटल्या. अर्थमंत्र्यांनी प्राप्तिकरामध्ये केलेल्या बदलामुळे सर्वसामान्य करदात्यांच्या उडालेल्या गोंधळाच्या प्रतिक्रिया मीम्स, विनोदी ट्विट्‌स आणि व्यंगचित्रांद्वारे मांडण्यात आल्या. 

प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये सर्वसामान्य नागरिकांना करदिलासा मिळेल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात फारसा फायदा होणार नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. नव्या टॅक्‍सस्लॅब हा पर्यायी असून त्याची निवड केल्यास पूर्वीच्या तब्बल 70 करसवलतींवर पाणी फेरावे लागेल, अशी माहिती तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे करदात्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्याबाबत काही लोकांनी समाजमाध्यमांवर मीम्स बनवत त्याची खिल्ली उडवली आहे. "अपेक्षा आणि वास्तव' या मथळ्याखाली अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे मीम्स बनवले. अर्थमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा समजण्यापलीकडे असल्याचे सांगणारे गमतीशीर ट्विट्‌स आणि मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

आमीर खानच्या "गजनी' चित्रपटातील काही दृश्‍यांचा वापर करत अर्थसंकल्प समजून घेतानाचे मीम्ससुद्धा व्हायरल झाले होते. त्याशिवाय अनेक सनदी लेखापालांनाही अर्थसंकल्प समजण्यापलिकडे असल्याचे सांगणारे विनोद अनेकांनी पोस्ट केलेत. त्याशिवाय अनेक व्यंगचित्रकारांनी अर्थसंकल्पावर भाष्य करणारे व्यंगचित्र रेखाटले. त्यामध्ये विशेषतः प्राप्तिकररचनेबाबत सर्वसामान्य करदात्यांचा झालेला गोंधळ व्यक्त करण्यात आला. त्याशिवाय अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये काही शब्दांचा वापर अनेकवेळा केला. त्यामध्ये "टॅक्‍स' हा शब्द त्यांनी 132 वेळा, तर "भारत' हा शब्द 72 वेळा वापरला. त्याबाबतही अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जेवढ्या वेळा "टॅक्‍स' शब्दांचा वापर केला, तेवढ्या वेळा अर्थमंत्र्यांनी करप्रणाली समजून सांगावी, असा खोचक मागणी काही जणांनी समाजमाध्यमावर केली. त्याबाबतचे मीम्ससुद्धा फार मजेशीर होते. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates :बीड अहिल्यानगर रेल्वे धावली

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

INDW vs AUSW : भारतीय संघाला धक्का! मधल्या फळीतील प्रमुख खेळाडूची मालिकेतून माघार; पुण्याच्या खेळाडूला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT