best
best 
मुंबई

''बेस्ट' बाबत तोडगा निघेपर्यंत माघार नाही'

सकाळवृत्तसेवा

मुंबई : संप मागे घेऊन कोणतीही चर्चा करणार नाही. आता माघार नाही. सन्मानपूर्वक तोडगा निघत नाही तोवर संप सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त करत कृती समितीचे नेते शशांक राव यांनी, संप चिरडण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा दिला. परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये आज झालेल्या कामगार मेळाव्यात कामगारांनी एकजूटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला. 

उद्या प्रत्येक आगारातून खासगी गाड्या चालविण्यात येणार आहेत. हा प्रकार संप चिरडण्याचा असून एकही गाडी चालू द्यायची नाही. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, असा इशारा राव यांनी प्रशासनाला दिला. उच्च न्यायालयाने कामगारांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला आहे. संपावर जाण्यास बंदी घातलेली नाही. त्यामुळे सोमवारी त्रिसदस्यीय समितीने बोलवलेल्या चर्चेला जाणार आहे. विलीनीकरणाला पालिका आयुक्तांनी विरोध केला आहे. आयुक्त कामगारांना विरोध करत असतील, तर आम्ही त्यांना सहकार्य का करायचे? असा सवाल राव यांनी केला. लेखी आश्‍वासन न देता आयुक्त, बेस्टचे महाव्यस्थापक वेठीस धरीत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

विविध कामगार संघटनांचा पाठिंबा 
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पालिका कर्मचाऱ्यांच्या म्युनिसिपल मजदूर युनियन संपात सहभागी होणार असून बेस्टच्या विद्युत विभागातील कामगार, पालिकेतील अभियंते संपात सहभागी झाले आहेत. आता अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाचे ऍडव्होकेट एस. के. शेट्टे, सुधाकर अपराज, मुंबई पोर्ट ट्रस्ट ऍण्ड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस मारुती विश्वासराव, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौड आदींनी या संपास पाठिंबा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT