mumbai Sakal
मुंबई

लसीकरण झालेल्या 'डॉक्टरांना' कोरोनाची बाधा

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या काही डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना (Corona) लसीचे (Vaccine) दोन घेतलेल्या लाभार्थींना कोरोना संसर्गाची बाधा होत असल्याचे समोर आले आहे. ऑगस्ट (August) मध्ये महानगरपालिका (Municipal) रुग्णालयातील (Hospital) पाच डॉक्टरांना (Doctor) लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ही बाधा झाल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांच्या (Doctor) नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सींग करून अभ्यास करण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.

कोरोना लसीकरणाचा निर्णय झाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या 5 डॉक्टरांना कोरोना संसर्गाचा बाधा होत असल्याचे समोर आले आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या डॉक्टरांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली.

बाधित 5 पैकी 4 डॉक्टर केईएम रुग्णालयातील आहेत. त्यात दोन महिला व 2 पुरुष डॉक्टर आहेत. त्यातील तिन डॉक्टर मायक्रो लॅब विभागातील सहाय्यक प्राध्यापक असल्याचे समजते. तर एक डॉक्टर लोकमान्य टिळक सार्वजनिक रुग्णालयातील असल्याचे कळते.

लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ही लाभार्थींच्या शरीरात आवश्यक प्रतिपिंडे तयार झाली नाहीत. डॉक्टर सतत रुग्णालयात आणि बाधित रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने त्यांना बाधा झाली असण्याची शक्यता आहे. लस घेऊन ही शरीरात प्रतिपिंडे तयार का झाली नाहीत ? डॉक्टरांना कोरोनाची बाधा का व कशी झाली ? लाभार्थींना इतर काही आजारांचा इतिहास आहे का याचा अभ्यास करण्यात येत आहे

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या काही डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली असली तरी हे प्रमाण तुलनेने कमी आहे.लसीकरण होऊन ही लाभार्थींच्या शरीरात प्रतिपिंडे तयार होत नसल्याचे दिसते. अशा प्रकरणांचा अभ्यास करण्यात येत आहे. अशा लाभार्थींचे नमुने घेऊन त्यांची मॉल्युक्युलर आणि जिनोम सिक्वेन्सींग चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आले असून स्वतः पालिका ही यावर अभ्यास करणार आहे.

https://www.oberoirealty.com/elysian?utm_source=digital&utm_medium=columbia&utm_term=ELYCLM&ad=0_5687660_ba93739e-2c1f-4d68-9646-99dde929f155-1sj4s_048a2f76-1a85-4051-b290-08932c7ed185-1sjd4_1788_58756452_144_348322_1_144_null_null_18_348011_348020_348006_null_1808_34755&col_ci=R132N802j3211629196104603ca3wdix2276kw4wn95v3k

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पावसाचा जोर पुन्हा वाढणार! महाराष्ट्रात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता

MPSC Paper Leak News: औषध निरीक्षक भरती परीक्षेवर पेपरफुटीचा आरोप, एमपीएससीचा इन्कार; अफवांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

Latest Marathi News Live Update: दुबईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे राजकोट विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

Marathi Children’s Play: हैदराबादमध्ये मराठीचा डंका: ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’ बालनाट्याने आंतरराष्ट्रीय रंगमंचावर जिंकली मने

Free Education: जगातील 'या' देशांमध्ये शिक्षण पूर्णपणे मोफत...सरकारच उचलते सर्व खर्च!

SCROLL FOR NEXT