SSC Result  
मुंबई

SSC Result : नादच खुळा! सरपंचाचा पुतण्या पास झाला याचेच साऱ्या गावाला कौतुक; ४३ टक्क्यांसह पठ्ठ्याने जिंकली...

शर्मिला वाळूंज

डोंबिवली - दहावीचा निकाल आज लागला आहे. परीक्षेत चांगले मार्क मिळाल्याने पालक व मुलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर कुठे कमी गुण मिळाल्याने आवडत्या क्षेत्रात करियरची करण्याची संधी काही जणांची हुकल्याने थोडी निराशा आहे. पण इथे हा पठया 43 टक्के गुण मिळवून पास झाला आहे. त्यानंतर गावात एकच जल्लोष झाला.

राये गावातील पियुष हा पास झाल्याने मित्रांनी त्याची ढोल ताशाच्या गजरात विजयी मिरवणूक काढली. हार, फुलांनी त्याचे स्वागत केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पियुषची ही मिरवणूक चर्चेचा विषय ठरली आहे.

दहावीचा निकाल आज लागला असून सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. पालक नातेवाईक आपल्या जवळच्या मुलांची मार्कशीट स्टेट्स वर ठेवून त्यांचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर देखील पालक आपल्या मुलांसोबत फोटो शेअर करून त्यांनी मिळवलेल्या गुणांचे तसेच त्यांच्या मेहनतीचे कौतुक करताना दिसतात.

पास झाल्याचा आनंद प्रत्येकाला असला तरी काही मुले ही भविष्यात करिअरच्या दृष्टीने मार्क मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र तेवढे मार्क मिळत नसल्याने त्यांचा हिरमोड झाल्याचे पहायला मिळत आहे. असे असतानाच कल्याण ग्रामीण मधील खडवली जवळील राये गावातील पियुष राहुल चन्ने हा दहावीच्या परीक्षेत 43 टक्के गुण मिळवून पास झाला आहे.

पियुष हा गावच्या सरपंच प्रतिभा चन्ने यांचा पुतण्या असून त्याने दहावीची परीक्षा पास केल्याने त्याचे कौतुक होत आहे. पियुष उर्फ बाली हा पास झाल्याने त्याच्या मित्रांना भलताच आनंद झाला असल्याचे दिसते. ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत मित्रांनी

त्याची विजयी मिरवणूक काढली. हार, फुलांनी त्याचे स्वागत करण्यात आले, पेढेही भरवण्यात आले. गावात फटाके फोडत नाचत गाजत ही मिरवणूक निघाल्याने गावकरी देखील त्याचे कौतुक करत होते.

पियुषच्या कौतुकाचे तसेच मिरवणूकीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याची आता चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT