Gunratn Sadavrte esakal
मुंबई

ST Bank Election Result : ॲड. गुणरत्न सदावर्तेंचे पॅनल आघाडीवर; दुसऱ्या क्रमांकावर...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेची २३ जून रोजी राज्यभरातील २८१ मतदान केंद्रावर निवडणूक पार पडली असून, रविवारी (ता.२५) रोजी सकाळी ९ वाजता पासून कॉटन एक्सचेंज बिल्डिंग, कॉटन ग्रीन येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

मध्यरात्री पर्यंत ही मतमोजणी चालणार असून, वृत्त लिहेपर्यंत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची एसटी कष्टकरी जनसंघ पॅनल ने आघाडी घेतल्याची चित्र असल्याने एसटी महामंडळातील प्रस्तापित संघटनांना मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आतापर्यंत सुमारे २०० मतदान केंद्रांवरील मतमोजणी करण्यात आली असून, पहिल्या क्रमांकावर सदावर्ते यांची एसटी कष्टकरी जनसंघ पॅनल, दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र एसटी कामगार संघटना तर तिसऱ्या क्रमांकावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची सेवा शक्ती संघर्ष पॅनल असल्याचे दिसून येत आहे.

दिवसभर या तीन संघटनांमध्येच चढाओढ दिसून आली असून, एसटी कर्मचारी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या पॅनल ला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

या निवडणुकीत १९ संचालक पदासाठी ६५ हजार मतदारांपैकी सुमारे ८५ टक्के म्हणजेच ५८ हजार मतदारानी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर २८१ मतदान केंद्र उभारण्यात आले होते. अजूनही सुमारे ८१ मतदान केंद्रांवरील निकाल शिल्लक असल्याने विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे बघावे लागणार आहे.

या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्था मुंबई शहरचे जिल्हा उपनिबंधक नितीन काळे यांच्या नेतृत्वात मतमोजणी पार पडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Tukaram Mundhe: बोगस दिव्यांगांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाई होणार?

World Record : भारताने मोडला रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात अशी अविश्वसनीय कामगिरी करणारी पहिली टीम

Viral Video: धावत्या ट्रेनमधील स्टंटवर नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले धाडस की..! पाहा व्हायरल व्हिडिओ

IND vs PAK: भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचं 'धुरंधर' स्टाईल सेलिब्रेशन अफगाणिस्तान अन् बलुचिस्तानमध्ये? Video होतायेत Viral

SCROLL FOR NEXT