ST Bus News esakal
मुंबई

ST News: एसटी बसला टोलमधून मुक्ती द्यावी ; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी

टोल बैठकीत सरकारला एसटीचा विसर

सकाळ डिजिटल टीम

ST News: मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्यात बैठक होऊन त्यात खाजगी वाहनांच्या टोल मुक्ती बाबत विस्तृत चर्चा झाली. शिवाय काही सकारात्मक निर्णय सुद्धा घेण्यात आले.

मात्र राज्याच्या सर्वांगीण विकासात सर्वात मोठा वाटा असलेल्या व राज्यातील खेड्या पाड्यातील गरीब प्रवासी जनतेचे एकमेव साधन असलेल्या एसटीकडून होत असलेल्या गैरवाजवी टोल वसुली बाबतीत साधी चर्चाही झाली नाही. हे दुर्दैवी असून सरकारला गरिबांच्या एसटीचा विसर पडला आहे का ?असा सवाल महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी उपस्थित केला आहे.

एसटीच्या साधारण साडे चौदा ते साडे चौदा हजार गाड्या प्रत्यक्ष रस्त्यावर धावत असून त्यातून दररोज ५२ लाख प्रवासी व दररोज साधारण ६० ते ७० हजार फेऱ्या होत आहेत.रस्तावर प्रत्यक्ष धावणाऱ्या प्रत्येक गाडी मागे एसटीला टोल भरावा लागत असून त्या मुळे एसटी महामंडळाला दरवर्षी सरासरी १६२ ते १६७ कोटी रुपये इतका टोल भरावा लागत आहे.

विविध कारणांमुळे महामंडळाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एसटीचा संचित तोटा ९००० कोटी रुपयांच्या घरात असून पुरवठादारांची आजही ८५० कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत.अशातच ज्येष्ठ नागरिक महिलांना शासनाने दिलेल्या प्रवासातील सवलतीमुळे व कर्मचाऱ्यांच्या व व्यवस्थापनाच्या अथक प्रयत्नांमुळे महामंडळ नफ्याच्या जवळ पोहोचले आहे. आता मासिक तोटा कमी झाला असून मासिक तूट फक्त २४ कोटी रुपये इतकी खाली आली आहे. एसटीला टोल मधून मुक्ती दिल्यास नफ्याच्या एकदम जवळ पोहचू शकते. व त्या मुळे साहजिकच राज्यातील गरीब प्रवासी जनतेला अजून चांगल्या सवलती देता येतील व दिलासा मिळू शकेल. या शिवाय महामंडळा समोरील आर्थिक अडचणी सुद्धा दूर होऊ शकतील. त्या मुळे पुढील बैठकीत सरकारने एसटी बसला लागणाऱ्या टोल वसुली बाबतीत सुद्धा फेर विचार करून टोल मधून एसटीला पूर्णतः मुक्ती द्यावी अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bus Accident : इलेक्ट्रिक 'शिवाई' बसची अनेक गाड्यांना धडक, घटनास्थळावरचा VIDEO आला समोर

Rain Update: भीषण घटना! क्रिकेटच्या मैदानावर वीज कोसळली; एका खेळाडूचा मृत्यू, अनेक जखमी, मान्सूनचा कहर

देऊळ बंद २ ने राजा शिवाजी सिनेमाचाही रेकॉर्ड मोडला, आतापर्यंत कमावले तब्बल इतके कोटी

Thane News: अंबरनाथ शिवमंदिर परिसरातील आरक्षणाविरोधात विहिंप-बजरंग दल आक्रमक, बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : भारत-इस्रायल संरक्षण सहकार्याला नवी गती; राजनाथ सिंह-आमीर बाराम यांची भेट

SCROLL FOR NEXT