मुंबई

राज्यातील STचा प्रवास महागणार, अधिकाऱ्यांसोबत परिवहन मंत्र्यांची प्राथमिक चर्चा

प्रशांत कांबळे

मुंबई: राज्यात सातत्याने होत असलेल्या डिझेल दरवाढीमुळे एसटीचा खर्च वाढतो आहे. त्यातुलनेत उत्पन्न मात्र घटले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने एसटीच्या प्रवासी भाडे वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दाखल केला असून, त्यावर प्राथमिक चर्चा झाली आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये डिझेलच्या दरवाढीमुळे झालेल्या आर्थिक तोट्याचा अहवाल परिवहन मंत्र्यांनी मागितला असून, भविष्यात सर्वसामान्यांचा एसटी प्रवास महागण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे आधीच एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. शिवाय एसटीच्या ताफ्यातील वाहनांची संख्या सुद्धा कमी झाली आहे. परिणामी उत्पन्नात घट झाल्याने, गेल्या वर्षात एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देणे सुद्धा कठीण झाले होते. त्यामध्येच नवीन वर्षात सातत्याने डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने, उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे एसटीच्या प्रवासांमध्ये वाढ करून हा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न महामंडळाचा सुरू आहे. नुकतेच भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे देण्यात आला असून, त्यावर प्राथमिक चर्चा सुद्धा एसटीच्या अधिकाऱ्यांसोबत परिवहन मंत्री ऍड.अनिल परब यांची सुद्धा झाली आहे. दरम्यान सततच्या डिझेल दरवाढीमुळे झालेले नुकसान आणि भविष्यात होणाऱ्या नुकसानीचा अहवाल मागितला असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. त्यानंतर यावर चर्चा करून दरवाढी संदर्भात निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

डिझेल दरवाढीमुळे दररोज 1 कोटीचे नुकसान

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात डिझेलचे दर 66 रूपये प्रति लिटर होते. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात 13 रूपयांनी वाढ होऊन 79 रूपये प्रति लीटर दर झाले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी दरवाढीमुळे दैनंदिन 1 कोटी रूपयांचा तोटा एसटी महामंडळाला सहन करावा लागत असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.

--------------------

(संपादन- पूजा विचारे)

ST Corporation submitted proposal state government increase fares ST bus

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : छठ पूजेच्या गाण्यांवरून राज ठाकरे आक्रमक; भाजपला दिला थेट इशारा, म्हणाले, 'हा महाराष्ट्र आहे, इथे मरहट्टे राहतात!'

Microsoft: जगभरात मायक्रोसॉफ्टची सेवा विस्कळीत! ७४ देशांमधील आऊटलुक, टीम्स आणि कोपायलट ठप्प; कोट्यवधी वापरकर्त्यांना फटका

NCP Merger: पडद्यामागे मोठ्या घडामोडी! सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून आमदारांना फोन?, पुण्यात पार्थ पवारांनी बोलावली तातडीची बैठक

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात दुष्काळाच्या झळा

Chandrakant Patil Gokul Election : 'चंद्रकांतदादा होणं सोपं नाही..'; निवडणुकीच्या अंदाजामुळे ट्रोल झालेल्या मंत्र्यांच्या बचावात उतरले समर्थक, शहरभर लागले 'दादा पॅटर्न'चे बॅनर्स

SCROLL FOR NEXT