ST Mahamandal  sakal
मुंबई

ST Mahamandal : वसुलीसाठी ‘एसटी’चे तुघलकी फर्मान

कोरोना काळात असंघटित कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून रोजंदारीवरील एसटी कामगारांना भत्ता देण्यात येत होता. तेव्हा दिलेला हा भत्ता वसुली करण्याचे काम एसटी महामंडळ प्रशासनाने सुरू केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना काळात असंघटित कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून रोजंदारीवरील एसटी कामगारांना भत्ता देण्यात येत होता. तेव्हा दिलेला हा भत्ता वसुली करण्याचे काम एसटी महामंडळ प्रशासनाने सुरू केले आहे. हातावर पोट असणाऱ्या गरीब कर्मचाऱ्यांच्या पगारातून हप्त्याने हे पैसे वसूल केले जात असल्याने कामगार वर्गातून हे तुघलकी फर्मान मागे घ्यावे, अशी मागणी होत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कामगारांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प होते, पण नगरपालिका, हॉस्पिटलसारख्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी सरकारने फक्त एसटी सेवा सुरू ठेवली होती. यामध्ये मुंबई परिसरात एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होती, तर ग्रामीण भागात ही सेवा कमी होती. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड कामावर बोलाविण्यात येत होते.

ज्या दिवशी कर्मचारी कामावर उपस्थित नसतील त्या दिवसाची हजेरी ग्राह्य धरून त्यांना आदेशाप्रमाणे वेतन दिले गेले. मात्र एसटीच्या सातारा विभागाने आता कर्मचाऱ्यांना दिलेल्या ६९ लाख रुपयांच्या वेतन रकमेची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT