Starting bus service from Dombivli to model college
Starting bus service from Dombivli to model college  
मुंबई

डोंबिवली ते मॉडेल कॉलेज बससेवा सुरु

संजीत वायंगणकर

डोंबिवली - खंबाळपाडा ठाकुर्ली परिसरात असलेल्या कॉलेज विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरेल अशा डोंबिवली  ते मॉडेल कॉलेज या बसची सुरवात राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आली.

स्थानिक नगरसेवक स्वर्गीय शिवाजी शेलार यांची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरुकरण्याचे अपूर्ण स्वप्न नगरसेवक साई शेलार यांच्या सततच्या प्रयत्नाने गुरुवारी त्यांच्या जयंतीचे औचित्यसाधून बस सेवा सुरु कररून पूर्ण करण्यात आले. यावेळी परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के, माजी नगरसेविका शिल्पा शेलार, जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, डोंबिवली शहर अध्यक्ष संजीव बिरवाडकर, नगरसेवक मुकुंद पेंडणेकर, निलेश म्हात्रे, विनोद काळण, काँग्रेसचे गंगाराम शेलार, यासह भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजू शेख, महिला शहर अध्यक्षा पूनम पाटील, वर्षा परमार, मॉडेल महाविद्यालयाचे चेअरमन प्रदीप नायर आदी मान्यवर उपस्थिती होते.

प्राचार्या अनुराधा काणे यांनी ही बस सेवा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांनीच्या सुरक्षततेचा प्रश्न सुटला असल्याचे सांगितले. याचबरोबर मंजुनाथ महाविद्यालयात नगरसेवक साई शेलार आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली क्राऊन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आयुर्वेदिक रोग निदान शिबिर भरविण्यात आले होते. या शिबिरात नाडी परीक्षण, बि. एम. आय. तपासणी, व्यायाम विषयी सल्ला, शरीर प्रकृती निदान, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, प्लस ओस्कीमीटर, इसीजी तपासण्या करण्यात आल्या परिसरातील रहिवाशांनी या शिबीराचा फायदा घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT