Admission
Admission 
मुंबई

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेश खडतर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी रात्री उशिरा प्रसिद्ध झाली. या यादीत ९० टक्केहून अधिक गुण मिळालेल्यांमध्ये सीबीएसई, आयसीएसई आणि इतर मंडळांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंडळातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत राज्य मंडळातील विद्यार्थ्यांची संख्याही खूपच कमी असल्याने नामवंत महाविद्यालयांमध्ये पहिल्या यादीत याच मंडळातील विद्यार्थ्यांचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अकरावी प्रवेशाची यादी जाहीर करण्यातही विलंब केला. अकरावी प्रवेशासाठी एक लाख ८५ हजार १७३ अर्ज आले होते. यामध्ये राज्य मंडळातील विद्यार्थ्यांची संख्या एक लाख ६८ हजार ९९१ आहे; तर सीबीएसई, आयसीएसई, आयसीसीएसई, आयबी आणि इतर मंडळांतील १९ हजार ४८२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये ९५ टक्केहून अधिक गुण मिळालेल्या एक हजार ४८७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये राज्य मंडळातील विद्यार्थ्यांची संख्या केवळ ३०१ आहे; तर इतर मंडळांतील विद्यार्थ्यांची संख्या एक हजार १८६ आहे. त्यामुळे इतर मंडळांतील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने राज्य मंडळातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग खडतर बनला आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगीनमध्ये जाऊन यादी तपासावी, यामध्ये काही बदल असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन उपसंचालकांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT