मुंबई

बलात्काराचा आरोप असलेल्या सावत्र वडिलांना सत्र न्यायालयाने नाकारला जामीन, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकार

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 12 : बलात्काराचा आरोप असलेल्या सावत्र वडिलांना सत्र न्यायालयाने जामीन नाकारला आहे. आरोपीच्या चांगल्या वर्तनाचे दाखले त्याच्या कुटुंबियांनी न्यायालयात दाखल केले तरी त्यामुळे या प्रकरणावर त्याचा परिणाम होणार नाही, असं विशेष पॉस्को न्यायालयाने सुनावले आहे.

पश्‍चिम उपनगरात राहणाऱ्या आणि सावत्र मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीने न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. या अर्जामध्ये आरोपीच्या चांगल्या वर्तणुकीची हमी देणारी काही प्रतिज्ञापत्र त्याच्या कुटुंबियांनी दाखल केली होती. मात्र ही प्रतिज्ञापत्र या प्रकरणात उपयोगी पडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका न्यायालयाने मांडली.

आरोपीचे वर्तन चांगले असून त्याने नेहमीच चांगल्या वृत्तीने मुलींशी व्यवहार केला आहे, असा दावा या प्रज्ञिापत्रातून करण्यात आला आहे. यामध्ये मूळ तक्रारदार महिला जी मुलींची आजी आहे आणि मुलींचे सख्खे वडिल यांचा समावेश आहे.

मुलींनी जाणीवपूर्वक वडिलांना या प्रकरणात अडकविले असून त्यांच्यावर नाहक आरोप केले आहेत. त्यांच्या बोलण्यावर विसंबून ही तक्रार केली असा दावा केला आहे. विशेष न्या. भक्ति काळे यांनी हा दावा अमान्य केला. संबंधित प्रकरण गंभीर असून आरोपीवर केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे त्यावर तपास होणे आवश्‍यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. आरोपीसाठी प्रतिज्ञापत्र दाखल झाले असले तरी त्याचा या प्रकरणात त्याचा उपयोग होणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आरोपीने या आधी तीन वेळा जामीनसाठी अर्ज केला होता. मात्र तीनही वेळा त्याचा अर्ज नामंजूर करण्यात आला. आगरीपाडा पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंदविली आहे. पोलिसांनी या जामीनाला विरोध केला होता. जर आरोपी सुटला तर तो तक्रारदार आणि मुलींना प्रभावित करु शकतो, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता.

step father accused with obscene behavior with daughter refused bail by session court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT