crime news sakal media
मुंबई

खालापूर : भांडणाऱ्या दोघांना समज देण्याचा प्रयत्न; पोलिसाच्या डोक्यात मारला दगड

सकाळ वृत्तसेवा

खालापूर : भांडणाऱ्या दोघांना समज देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाच्या डोक्यात दगड (stone hit on police) आणि सिमेंटचा पत्रा मारून त्याला जखमी केले. याप्रकरणी (two culprit arrested) दोघांना अटक करण्यात आली. खोपोली पोलिस ठाण्यात (Khalapur police station) कार्यरत सोमनाथ तांदळे हे मंगळवारी न्यायालयातील खटल्याबाबत समन्स बजावणी करण्याकरिता मुकुंदनगर, भानवज खोपोली येथे गेले होते.

त्या ठिकाणी धनराज सुरेश जंबगी आणि रामराज सुरेश जंबगी हे भांडण करून एकमेकांना शिवीगाळ करत होते. यावेळी तांदळे यांनी दोघांनी भांडण थांबवावे, असे सांगितले; परंतु भांडण करणाऱ्या रामराज आणि धनराज यांनी तांदळे यांच्यावर हल्ला केला.

रामराज याने सिमेंटचा पत्रा, तर धनराज याने दगड डोक्यात मारून तांदळे यांना जखमी केले. तांदळे यांच्याकडील शासकीय कागदपत्रे फाडून त्यांना शिवीगाळ केली. या घटनेबाबत खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT